विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहिल्यांदा अर्थ संकल्प जाहीर केला. या अर्थ संकल्पत पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. पुणे शहरातील वाहतूक, पायाभूत सुविधा, उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्राला मोठी चालना देणाऱ्या घोषणा केल्या आहेत. यावेळी त्यांनी मुंबई आणि पुणे या दोन शहरांना मिळून जवळपास 50 अब्ज डॉलरचे जागतिक आर्थिक केंद्र बनवण्याचे त्यांनी अर्थ संकल्पात सांगितले. Devendra Fadnavis
पुणेकरांसाठी सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मिळालेली अधिकृत मंजुरी. या टप्प्यात खडकवासला–स्वारगेट–हडपसर–खराडी हा महत्त्वाचा मार्ग समाविष्ट असून शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होणार आहे. तसेच तळेगाव ते चाकण या औद्योगिक पट्ट्याला जोडणाऱ्या उन्नत मेट्रो मार्गालाही हिरवा कंदील देण्यात आला आहे. याशिवाय रेल्वे प्रवाशांसाठी पुणे–लोणावळा तिसऱ्या रेल्वेमार्गाचे काम वेगाने सुरू आहे. यासोबतच त्यांनी येरवडा–कात्रज आणि हिंजवडी–सिंहगड रस्ता या नवीन वाहतूक मार्गांच्या आराखड्यांवरही काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. Devendra Fadnavis
याशिवाय अनेक अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी विशेष प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे जमीन संपादन आणि प्रत्यक्ष बांधकाम प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच बारामती विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. Devendra Fadnavis
तसेच रस्ते वाहतुकीसाठी शिरूर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान ग्रीनफिल्ड महामार्ग उभारण्यास मान्यता देण्यात आली असून यामुळे पुणे आणि मराठवाडा विभागातील संपर्क सुलभ होण्यास मदत होणार आहे. याशिवाय पुण्यातील शेती क्षेत्रासाठीही अर्थ संकल्पत तरतूद करण्यात आली असून बारामती आणि पुरंदर तालुक्यातील महत्त्वाच्या असलेल्या ‘नीरा–कऱ्हा’ नदी जोड प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील पाणी टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय खंडाळा येथे जागतिक दर्जाचे इनोव्हेशन सेंटर उभारण्यासाठी 130 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
पुण्यासाठी केलेल्या या घोषणामुळे पुण्यातील पायाभूत सुविधा, उद्योग व्यवसाय आणी रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील अशी अपेक्षा पुणेकरांकडून व्यक्त केली जात आहे.
Pune Gets Development Package in Budget Presented by Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Uday Samant : दावोस करारांवर लवकरच ‘भगवी पत्रिका’; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती
- Mundhe : तुकाराम मुंडे यांचा कारवाईचा बडगा, बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणारे 316 अधिकारी – कर्मचारी निलंबित
- Navnath Bane : उबाठा गटाचे निर्णय आता उद्धव ठाकरे नव्हे, तर संजय राऊत घेऊ लागलेत ! नवनाथ बन यांची टीका
- पुण्यातील प्रसिद्ध वसतिगृहात विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीमार; कारणही धक्कादायक, अनेक विद्यार्थी जखमी!