हॉर्मुज सामुद्रधुनीजवळ २०० हून अधिक जहाजे अडकली; मुंबईतील कॅप्टन ३३ क्रूसह प्रतीक्षेत

विशेष प्रतिनिधी

मुंबई: हॉर्मुज सामुद्रधुनीजवळ ( Strait of Hormuz) सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर २०० हून अधिक जहाजे अडकली आहेत. त्यामध्ये मुंबईतील एका कॅप्टनचा टँकरही अडकला आहे. दहिसर पूर्व येथे राहणारे कॅप्टन वीरेंद्र विश्वकर्मा हे आपल्या ३३ क्रू सदस्यांसह २ मार्चपासून तेथे अडकून पडले आहेत.

कॅप्टन विश्वकर्मा सांगतात की परिसरात सतत मिसाईल आणि ड्रोन उडताना दिसत आहेत. सायरन वाजत असल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय नौदलाच्या संरक्षणाखाली जहाज सुरक्षितपणे भारतात परत येईल, अशी आशा ते व्यक्त करत आहेत.

कॅप्टन विश्वकर्मा ज्या टँकरचे नेतृत्व करत आहेत त्यामध्ये सुमारे ३६ लाख घरगुती सिलेंडर भरण्यासाठी पुरेसे एलपीजी आहे. हे जहाज कुवैतमधील मीना अल अहमदी पोर्ट (Mina Al Ahmadi Port) येथून लोड करण्यात आले होते आणि गुजरातमधील दीनदयाल पोर्टकडे जात होते.



सध्या हे जहाज संयुक्त अरब अमिरातीतील Ras Al Khaimah येथील Mina Saqr Port जवळ थांबलेले आहे. जहाजावर सुमारे ६० दिवस पुरेल इतका अन्नसाठा असल्याची माहिती देण्यात आली आहे. जहाज चालवणारी कंपनी GESCO भारतीय नौदल आणि संबंधित मंत्रालयांच्या संपर्कात असल्याचेही सांगितले जात आहे.

कॅप्टन विश्वकर्मा यांनी सांगितले की, आमच्या डोळ्यांसमोर मिसाईल आणि ड्रोन उडत आहेत. सतत सायरन वाजत असल्याने कधीही काहीही होऊ शकते अशी भीती वाटते. आम्ही भारतीय नौदलाच्या काफिल्याची वाट पाहत आहोत, असे त्यांच्या पत्नी निल्या यांनी सांगितले.

माझे पती आणि त्यांचा क्रू सुरक्षितपणे घरी परत यावा यासाठी मी प्रार्थना करत आहे. अनेक दिवसांपासून मला नीट झोपही लागलेली नाही. मी आणि माझी दोन मुले व्हॉट्सअ‍ॅप ऑडिओ-व्हिडिओ कॉलवर त्यांच्याशी बोलतो, पण जहाजावर इंटरनेट कधी कधीच चालते.

Over 200 Ships Stranded Near Strait of Hormuz; Mumbai Captain Waiting with 33 Crew

महत्वाच्या बातम्या