Ambadas Danve ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर: शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांना अज्ञात व्यक्तीने फोनवरून ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अंबादास दानवे यांनी या प्रकरणी त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. Ambadas Danve

अज्ञात व्यक्तींनी रविवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास फोनवरून अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी खबरदारी म्हणून पोलिसांनी दानवेंच्या घराबाहेर बंदोबस्त तैनात केला आहे. ही धमकी कुणी दिली? याचा तपासही सुरू केला आहे. फोन कॉल कोणत्या क्रमांकावरून आला? तो कुठून करण्यात आला? व त्यामागे कुणाचा हात असू शकतो? अशा विविध प्रश्नांचा माग पोलिस काढण्याचा प्रयत्न करत आहे. सायबर सेलचीही मदत घेण्यात येत आहे. Ambadas Danve



अंबादास दानवे म्हणाले, मागील काही दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. मात्र आपण त्याला गांभिर्याने घेतले नाही. रविवारी पहाटे 2 च्या सुमारास मला पुन्हा फोन आला. त्यामुळे खबरदारी म्हणून आम्ही पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दानवे यांनी आपल्या तक्रातीत त्यांनी ज्या क्रमांकावरून फोन आला तो क्रमांकही दिला आहे. धमकी देणाऱ्याने ठोकून काढू, कापून टाकू असे म्हटले.

दानवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 11 ते 14 मार्चपर्यंत सलग 4 दिवस रात्री 154 ते 2 च्या सुमारास लागोपाठ फोन आले. फोन करणाऱ्यांनी मला कापून टाकण्याची धमकी दिली. ही धमकी 9595959303 या क्रमांकावरून देण्यात आली. या घटनेमुळे माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या सुरक्षेस धोका संभवू शकतो. त्यामुळे या घटनेची रीतसर चौकशी करून कारवाई करण्यात यावी. Ambadas Danve

Ambadas Danve Receives Death Threat: “We Will Beat and Cut You,” Warning Sparks Concern

महत्वाच्या बातम्या