निदा खान घरात राहणार माहित नव्हते, एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याचा कांगावा

विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाशिकमधील टीसीएस कंपनीतील धर्मांतराचा प्रयत्न तसेच लैंगिक अत्याचारप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय देणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल तसेच घरमालक हनिफ खान याची नाशिकमधील गुन्हे शाखेत पाच तास कसून चौकशी करण्यात आली. निदा खानच्या मावशीला घर भाड्याने दिले, निदा खान राहणार असल्याचे माहित नव्हते असा कांगावा मतीन पटेलने केला आहे.



यावेळी मतीन पटेलचा माेबाइल एसआयटीने ताब्यात घेतला. मतीन पटेल व हनिफ खान हे दोघेही छत्रपती संभाजीनगरातील नारेगाव भागातील रहिवासी आहेत. दोघेही त्यांच्या वकिलामार्फत चौकशीला हजर झाले होते. निदा खान ४० दिवस पोलिसांना गुंगारा देत होती. ती मुंब्रा येथून सोलापूरला गेली व तेथून ती छत्रपती संभाजीनगरात आली होती. ज्या दिवशी तिला अटक झाली, त्याच्या चार दिवस अगोदरच ती छत्रपती संभाजी नगरात भाड्याच्या घरात राहण्यासाठी आली होती, अशी माहिती मतीन पटेल यांनी चौकशीत दिली. सकाळी ११:०० वाजता मतीन पटेल व हनिफ खान चौकशीला हजर झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत चौकशी सुरू होती. निदाच्या मावशीच्या मदतीने संपर्कात आपण निदा खानच्या संपर्कात कसे आलात? असा प्रश्न मतीन पटेलला चौकशीत विचारण्यात आला. तेव्हा निदाच्या मावशीने संपर्क साधला, तेव्हा तिने घर निदासाठी घेतेय, ही माहिती दिली नव्हती.माझ्याकडे भाड्याच्या घरासाठी निदाच्या मावशीने संपर्क साधला असता मी हनीफ खानशी संपर्क साधला, तेव्हा निदा हनीफच्या घरी राहायला गेली, अशी सबब पटेल याने पोलिसांना सांगितली, तर हनीफने निदाला ओळखत नव्हताे, असे सांगितले.

“We didn’t know Nida Khan was staying there”: AIMIM corporator Mateen Patel calls allegations a smear campaign

महत्वाच्या बातम्या