विशेष प्रतिनिधी
पुणे: विषारी दारूमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात एकाच दिवशी १३ जणांचा धक्कादायक मृत्यू झाला आहे.पिंपरी चिंचवड मधील दापोडी आणि फुगेवाडी भागात ८ जणांचा मृत्यू असून, पुण्यातील काळेपडळ येथील तीन तर हडपसर भागात २ जणांचा मृत्यू झाला आहे. स्पिरीटयुक्त विषारी दारूमुळे तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला आहे.दापोडी,फुगेवाडी,काळेपडळ आणि हडपसर भागातील काही नागरिकांनी ही दारू प्राशन केल्यानंतर तोंडाला फेस येऊन मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
एकूण ८ जणांना अटक..
विषारी दारू प्रकरणात पोलिसांनी योगेश वानखेडे, कर्नलसिंग विरखा आणि त्याचा इतर ८ नातेवाईकांना पोलिसांनी अटक केली आहे.योगेश वानखेडे हा सराईत दारू विक्रेता असून, यापूर्वी देखील त्याचावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.योगेश वानखेडे कडून पुरवठा करण्यात आलेली दारू पिंपरी चिंचवड मध्ये एका अड्ड्यावर कर्नलसिंग विरखा विकत होता. सध्या पिंपरी चिंचवडमधील दारूच्या अड्ड्याबाहेर नागरिकांचा जमाव एकत्र आल्याचे बोलले जात आहे.
उरुळी कांचन येथे बनायची दारू..
उरुळी कांचन येथे पोलिस ठाण्याचा हद्दीत ही विषारी दारू बेकायदेशीरपने तयार करण्यात येत होती.दारूची नशा अधिक वाढण्यासाठी मुख्य आरोपी योगेश वानखेडे याने दारूमध्ये तब्बल २१५ लिटर शरीरास घातक असलेले
‘ मिथेनॉल ‘ मिसळले. विषारी रसायन मिश्रित दारू पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात बेकायदेशीर दारू अड्ड्यावर विक्रीसाठी पाठवण्यात आली होती, ही दारू पिल्यानंतर १३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
या भयंकर प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर मुख्य आरोपी असलेला योगेश वानखेडे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. विषारी दारू प्रकरणात योगेश वानखेडेचा सहभाग स्पष्ट झाला असून, पोलिसांनी याप्रकरणात एकूण ८ जणांना ताब्यात घेतले आहे. विषारी दारू रॅकेटमागे अजून कुणी आरोपी आहे का,याचा सखोल तपास सध्या सुरू आहे.
Poisonous liquor wreaks havoc in Pune! 13 people die in Pune-Pimpri Chinchwad, 8 arrested