विशेष प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड: Dapodi police फुगेवाडी परिसरातील कथित गावठी व विषारी दारू प्रकरणात निष्काळजीपणा आणि पर्यवेक्षणातील त्रुटी आढळल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर पोलिस दलातील दोन अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त विनोय कुमार चौबे यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.Dapodi police
निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये दापोडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, तपास पथकाचे (गुन्हे शोध) प्रमुख, फौजदार राजू भास्कर आणि कर्मचारी जयदीप सोनवणे, नवनाथ पोटे, सागर जाधव, विशाल काळे यांचा समावेश आहे.Dapodi police
या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बातम्या प्रसारित झाल्या असून, पोलिस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. आदेशात नमूद केल्यानुसार, संबंधित अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा आणि पर्यवेक्षणाचा अभाव यामुळे ही घटना घडल्याचे प्राथमिक निरीक्षणात दिसून आले आहे.
त्यामुळे मुंबई पोलीस (शिक्षा व अपील) नियम १९५६ आणि मुंबई पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत अधिकारांचा वापर करत तिघांनाही तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत ही कारवाई लागू राहणार आहे.
निलंबन काळात संबंधित अधिकाऱ्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता, महागाई भत्ता तसेच घरभाडे भत्ता मिळणार आहे. मात्र या कालावधीत कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय स्वीकारल्यास निर्वाह भत्त्याचा हक्क गमवावा लागणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच निलंबन काळात कोणत्याही प्रकारची रजा मंजूर होणार नसून मुख्यालय सोडण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. दररोज पुणे शहर नियंत्रण कक्षात हजेरी लावण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
Four Dapodi police personnel, including two officers, suspended over toxic liquor tragedy
महत्वाच्या बातम्या