विशेष प्रतिनिधी
पुणे :- पुण्यात बिश्नोई गँगकडून पुन्हा व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकीचा फोन आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पुण्यातील एका बड्या व्यापाऱ्याकडे बिश्नोई गँगकडून तब्बल 2 कोटींची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, एका आठवड्यात पुण्यात तिसऱ्यांदा बिश्नोई गॅंगकडून व्यापाराकडे खंडणी मागण्यात आल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. मात्र गेल्या एका आठवड्यात पुण्यात बिश्नोई टोळीकडून येणाऱ्या खंडणीच्या मागणीने व्यापारीवर्गात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.Bishnoi gang
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी इंटरनेट-कॉलवर या व्यापाऱ्याला धमकीचा फोन आला. त्याने आपली ओळख शुभम लोणकर अशी करून दिली.पुण्यातील उत्तम नगर भागात व्यापाऱ्याला फोन करून खंडणीसाठी धमकी देण्यात आली आहे . या प्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तक्रारदार उत्तमनगर-शिवणे मर्चंट्स असोसिएशनचे पदाधिकारी असल्याचे सांगताना त्याने त्यांचा बांधकाम व्यवसाय, कारचा नोंदणी क्रमांक तसेच दैनंदिन हालचालींची माहिती असल्याचा दावा केला. याचवेळी कुटुंबातील सदस्यांची माहिती असल्याचे सांगत स्वतःची काळजी घ्या, असा इशारा देत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर 2 कोटी तयार ठेवण्यास सांगून पुढील सूचना लवकरच देऊ, असे धमकावले. यानंतर तक्रारदारांनी तत्काळ उत्तमनगर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
गेल्या आठवड्यात पुण्यात बिष्णोई टोळीने खंडणी मागण्याची ही तिसरी घटना आहे. 22 जून रोजी वानवडी परिसरातील एका स्टील उद्योगपतीकडे 50 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. त्यानंतर मांतरवाडी येथील त्यांच्या कारखान्यावर गोळीबार केला होता. 23 जून रोजी वडकी येथील औषध घाऊक विक्रेत्याकडे 2 कोटींची खंडणी मागण्यात आली होती.
कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?
लॉरेन्स बिश्नोई याचं खरं नाव सतविंदर सिंग आहे. त्याचा जन्म 1993 मध्ये पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील एका गावात झाला. बिश्नोईने कॉलेजच्या काळातच गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला होता. लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात कैद आहे. त्याच्यावर खून, खुनाच्या उद्देशाने हल्ला, चोरी, दरोडा, खंडणी असे सुमारे 50 गुन्हे दाखल आहेत. सिद्धू मूसवाला आणि जयपूरमध्येकरणी सेनेच्या अध्यक्षाची हत्या तसेच पंजाबी गायक गिप्पी ग्रेवाल आणि एपी धिल्लन यांच्यावर झालेल्या गोळीबारातही त्याचे नाव पुढे आले आहे.
Bishnoi gang spreads terror in Pune; another threat call demanding ₹2 crore.
महत्वाच्या बातम्या
- केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात; विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
- राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा अखेर राजीनामा
- सुशिक्षित मुलांमध्ये सूडबुध्दी का निर्माण हाेतेय? केतन अग्रवाल प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे भाष्य
- केतनला टक्कल असल्याने सियाला नव्हता पसंद, पाेलीस चाैकशीत कबुली