बाथरुमच्या फरशीखाली गाडला मृतदेह ; पत्नीनेच केला पतीचा खून

विशेष प्रतिनिधी

आग्रा :- उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या ४५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पतीचा खून murder करून पत्नीने त्याचा मृतदेह चक्क घराच्या बाथरुमच्या फरशीखाली गाडला होता. पोलिसांनी हा मृतदेह बाहेर काढला असून आरोपी पत्नीला अटक केली आहे.

सुरेंद्र शर्मा हे १८ मे २०२६ पासून अचानक बेपत्ता झाले होते. २६ मे रोजी पत्नी रुबीने स्वतः सिकंदरा पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर तब्बल ४५ दिवस ती नातेवाईक आणि पोलिसांसमोर पती घरी न आल्याचे सांगून रडण्याचे नाटक करत होती.एका जुन्या प्रकरणाच्या पडताळणीसाठी जेव्हा पोलीस त्यांच्या घरी पोहोचले, तेव्हा रुबी घाबरली आणि तिची वर्तणूक संशयास्पद वाटली .तसेच सुरेंद्र यांच्या भावानेही पोलिसांकडे रुबीच्या वागण्याबद्दल संशय व्यक्त केला. पोलिसांनी घरात सखोल तपास केला असता, बाथरुममधील नव्याने बसवलेल्या टाईल्स आणि सिमेंटच्या प्लास्टरवर त्यांची नजर गेली. संशय आल्याने पोलिसांनी ती जागा खणली आणि त्यातून सुरेंद्र यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर आला.



खाण्यात गुंगीचे औषध अन् गळा आवळून खून

आरोपी पत्नी रुबीने आपला गुन्हा कबूल केला असून लग्नाला १६ वर्षे झाली असली, तरी सुरेंद्र यांच्या दारूच्या व्यसनामुळे त्यांच्यात वारंवार भांडणे होत असत. घटनेच्या दिवशी रुबीने आपल्या दोन्ही मुलींना मोठ्या भावाच्या घरी पाठवले. त्यानंतर सुरेंद्र यांच्या खाण्यात गुंगीच्या गोळ्या घातल्या . सुरेंद्र बेशुद्ध पडताच तिने गळा आवळून त्यांचा खून murder केला. रुबीने रात्रीच बाथरुममध्ये खड्डा खणून मृतदेह त्यात गाडला वरून माती टाकून त्यावर सिमेंट आणि नवीन टाईल्स लावून घेतल्या जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या संपूर्ण कटात रुबीला इतर कोणाची मदत लाभली होती का, तसेच बाथरुमचे काम करणाऱ्या मजुरांना याची कल्पना होती का, याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Body buried under bathroom floor; wife kills husband.

महत्वाच्या बातम्या