विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Fadanvis राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्या शेतकऱ्यांचे 50 हजारांऐवजी 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.CM Fadanvis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिले. विरोधकांनी गुरुवारी (9 जुलै) अंतिम आठवडा प्रस्ताव मांडताना या प्रस्तावाच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीबाबत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. शेतकरी कर्जमाफी संदर्भात मोठी घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यांवर अंतिम आठवडा प्रस्तावात बरीच चर्चा झाली. कर्जमाफी ही परिस्थितीची आवश्यकता आहे म्हणून आपण करतो. कुठल्याही कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही किंवा होऊ शकत नाही. मात्र, त्या-त्यावेळी शेतकऱ्यांना क्रेडिटवरती बनवायचे, जेणेकरून शेतकऱ्याला सावकाराकडे जावे लागणार नाही, हे त्यामागचे एक उद्दिष्ट असते. मी पुन्हा एकदा सांगतो की, आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी शब्द दिला होता की आम्ही कर्जमाफी करू. खरे तर कर्जमाफी देण्यासाठी 2029 पर्यंत आम्ही थांबू शकलो असतो. कारण आम्ही सर्व निवडणुका जिंकलो आहोत. मात्र, आम्ही तसे केले नाही. आम्ही ठरवले की शेतकरी अडचणीत असेल तर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. त्यामुळे आपल्या सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.CM Fadanvis
देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरकारने काय काय केले? तर कर्जमाफीच्या व्यतिरिक्त दरवर्षी 25 हजार कोटी रुपये वीजमाफी सरकार देते. हे पैसे भरावे लागतात. पहिल्या वर्षी 20 हजार कोटी, दुसऱ्या वर्षी 22 हजार कोटी आणि तिसऱ्या वर्षी 25 हजार कोटी रुपये आपण भरतो. आता कर्जमाफीचा निर्णय घेताना सर्व बँकांची बैठक घेतली आणि त्यानंतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ आपण जाहीर केली. या माध्यमातून ५६ लाख शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटींचा लाभ देणारी ही कर्जमाफी योजना आहे, अशी माहिती देत मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेत आपण 2 लाखांपेक्षा जास्त ज्यांची बाकी आहे, त्यांनाही 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी योजनेचा लाभ देत आहोत. आपल्याला शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असताना बँकिंग सिस्टिमचाही काही विचार करावा लागतो. आता या कर्जमाफीबाबत खूप अटीशर्ती आहेत, यावरून सवाल विचारले गेले. काही आमदार मला भेटले आणि म्हणाले की शेतकरी कर्जमाफीतील 50 हजारांची ती अट काढून टाका. तेव्हा मी त्यांना सांगितले की जर ही अट काढली तर सरकारला 3 ते 4 हजार कोटींचा भुर्दंड येईल. ही अट एक शिस्तीचा भाग म्हणून आपण ठेवली होती.
आता ज्या शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्यांना आपण 50 हजार रुपयांची अट घातली होती. त्या माध्यमातून 50 हजार रुपयांपर्यंत कर्जमाफी आपण म्हटले होते. मात्र, आता महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही थेट 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळेल. त्याचबरोबर 2026-27 चा कर्ज भरण्याच्या संदर्भातील नियम वगळण्यात येईल. म्हणजे 2026 ला किती लोकांनी कर्ज भरले, तर 95 टक्के लोकांनी भरले. त्या आधीच्या तीन पैकी दोन वर्षात ज्यांनी पैसे भरले ते देखील आता पात्र होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत करत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
Farm loan waiver limit raised to ₹2 lakh, CM Fadanvis announces
महत्वाच्या बातम्या