कोरेगाव पार्क बलात्कार प्रकरणातील चौघांना पोलीस कोठडी

विशेष प्रतिनिधी

पुणे : घरी सोडण्याच्या बहाण्याने धावत्या मोटारीत एका वकिल तरूणीवर अत्याचार केल्या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीसांनी चार जणांना अटक केली आहे. न्यायालयाने या चौघांना चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

अभिषेक नवनाथ मुटके (वय ३०), आदेश अरूण शिंदे (वय २५), धनंजय चंद्रकांत सोरटे (वय ३३), शुभम रमेश कुटे (वय ३०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पिडीतेने फिर्याद दिली असून, १७ मे ते १८ मे कालावधीत कोरेगाव पार्क परिसरात ही घटना घडली.



पिडीत तरूणी रविवारी रात्री ती मित्रांसोबत एका पबमध्ये गेली होती. मित्र पबमधून गेल्यानंतर तिची आरोपींसोबत ओळख झाली. त्यानंतर आरोपींनी तिला घरी सोडतो, असे सांगितले. तिला मोटारीतून नेऊन काही अंतरावर निर्मनुष्य असलेल्या ठिकाणी गाडी कडेला उभी करून तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला. तरूणीच े साहित्य रस्त्यावर फेकून ते पसार झाले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

या प्रकरणी चौघांना न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त करायचची आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी, आरोपींच्या मोबाईलचे सायबर तज्ञांमार्फत तांत्रिक विश्लेषण करायचे आहे, आरोपींच्या मोबाईलमध्ये गुन्ह्याच्या अनुषंगाने आणखी काही पुरावे मिळतात का त्याबाबत तपास करण्यासाठी, त्यांचा आणखी कोणी साथीदार होता का?, त्यांनी अशा स्वरूपाचे आणखी गुन्हे केले आहेत का?, यासह गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी त्यांना पोलीस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील अ‍ॅड. योगेश कदम यांनी केला. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.

Four remanded to police custody in Koregaon Park rape case

महत्वाच्या बातम्या