Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये तिकिट वाटपावरून शिवसेना शिंदे गटात प्रचंड नाराजी

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhajinagar  छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीतील तिकिट वाटपावरून शिवसेना शिंदे गटात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले.Chhatrapati Sambhajinagar

प्रभाग क्रमांक २० मधून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असलेले पक्षाचे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते सुनील सोनवणे यांनी तिकीट नाकारल्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे. “ज्यांनी आम्हाला कालपर्यंत गद्दार म्हटले, त्यांच्यासाठी आम्हाला बाजूला केले जात आहे,” असा संताप व्यक्त करत सोनवणे यांनी संजय शिरसाट यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन सुरू केले आहे.Chhatrapati Sambhajinagar

सुनील सोनवणे यांनी माध्यमांशी बोलतान संताप व्यक्त केला. आम्ही गेल्या २० वर्षांपासून निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करत आहोत. शिंदे साहेबांच्या उठावामध्ये आम्ही पहिल्यापासून आहोत. उठावात असताना शिंदे आम्हाला न्याय देतील, असे वाटत होते. कालपर्यंत आम्हाला गद्दार म्हणणारे, आम्हाला तलवारी दाखवणारे आज आमच्या पक्षात येऊन मुख्य झाले. इथे आम्ही मुख्य पाहिजे होतो. ते पैशावाले असल्यामुळे मुख्य आहेत का? असा संतप्त सवाल सुनील सोनवणे यांनी केला. माझी उमेदवारी रद्द करून, भाजपमधून आयात केलेल्या माणसाला दिली. त्यांच्यात असे काय आहे? जे माझ्यात नाही, हे मला शिरसाटांनी सांगावे.Chhatrapati Sambhajinagar



सोनवणे यांनी केवळ नेत्यांवरच नव्हे, तर स्थानिक रणनीतीवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मी सगळ्या मोर्चात आहे. मी पाच वर्ष डीपीडीसीचा मेंबर होतो. पण मी साहेबांना ताण न देण्यासाठी डीपीडीसीचा कोणताही फंड घेतला नाही. एक तिकिट मागितले होते. पण तेही भाजपमधून आलेल्या आयात माणसाला दिले. म्हणजे त्र्यंबक तुपे यांनी फिक्सिंग केली. भाजपचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी शिंदे गटाकडून एकदम कमकुवत उमेदवार दिला. असेच कारस्थान त्र्यंबक तुपे याने भाजपसोबत मिळून केले, असे मला वाटते, असा आरोप सुनील सोनवणे यांनी केला.

दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून छत्रपती संभाजीनगर भाजपमध्ये सुरू असलेला उद्रेक आज सलग दुसऱ्या दिवशीही कायम होता. अनेक वर्षांपासून पक्षासाठी राबणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचा आरोप करत आज कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. आज दुपारी भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्त्यांनी ‘तांडव’ केले. यावेळी कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला कार्यकर्त्यांनी काळं फासून निषेध नोंदवला, तर डॉ. भागवत कराड यांची गाडी आंदोलकांनी रोखून धरली. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, दोन्ही नेत्यांना पोलिसांच्या कडक बंदोबस्तात तिथून पळ काढावा लागला.

Huge displeasure in Shiv Sena Shinde faction over ticket distribution in Chhatrapati Sambhajinagar

महत्वाच्या बातम्या