Sharad Pawar : शरद पवार म्हणतात, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल मला माहितीच नाही

विशेष प्रतिनिधी

बारामती : Sharad Pawar  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जवळीक वाढल्याचे म्हटले जात आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचीही चर्चा आहे. पण सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री शपथविधी संदर्भात आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या चर्चाच असल्याचे समोर आणले आहे.Sharad Pawar

पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले, सुनेत्रा पवार शपथ घेणार, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. पटेल, तटकरे पक्षाचे प्रमुख, तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी काय करावं हे ठरवलं, त्यावर भाष्य करणार नाही. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल मला माहितीच नाही. सुनेत्रा पवारांसोबत कोणतीही चर्चा नाही.Sharad Pawar



शरद पवार म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल इतकी घाई मी केलेली नाही. सुनेत्रा पवारांशी माझी काहीही चर्चा झालेली नाही. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये विलीनीकरणाबद्दल चर्चा झाली होती. याबद्दल संपूर्ण जबाबदारी अजित पवारांकडे होती. पण या सर्व गोष्टीमध्ये आता खंड पडला आहे.

अजित पवार यांच्या एकत्रीकरणाची इच्छा पूर्ण व्हावी ही आमची इच्छा आहे. गेल्या 4 महिन्यापासून ही चर्चा सुरू होती, आता कोण चर्चा करणार हे ठरेल. दोन्ही पक्षामध्ये संवाद रहावा यासाठी आम्ही सकारात्मक होतो. विलीनीकरणाबद्दल निर्णय 12 तारखेला जाहीर करणार होते, त्या चर्चेत मी नव्हतो पण जयंत पाटील आणि अजित पवारांचे बोलणं झाले होते.

Sharad Pawar Says He Is Unaware of Sunetra Pawar’s Oath-Taking Ceremony

महत्वाच्या बातम्या