Rohit Pawar : सुनेत्रा काकींमध्ये अजितदादांचेच प्रतिबिंब, रोहित पवार यांनी दिले पवार कुटुंब एकत्र येण्याचे संकेत

विशेष प्रतिनिधी

बारामती : Rohit Pawar  सगळ्या पवार कुटुंबाने एकत्र यावे, ही अजितदादांची मनापासूनची इच्छा होती. अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; मात्र एक परिवार म्हणून मला सुनेत्रा काकींमध्ये अजितदादांचेच प्रतिबिंब दिसते, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पवार कुटुंब एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदासह अजितदादांकडील सर्व खाती मिळावीत, ही त्यांची इच्छा होती आणि आता त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात, असेही ते म्हणाले.Rohit Pawar

रोहित पवारांनी म्हणाले की, अजितदादांचे स्वप्न हे पवार कुटुंब एकत्र राहावे, असेच होते. या दिशेने दादांकडून प्रयत्न सुरू होते. सुप्रिया ताई, पवार साहेब आणि आम्ही सर्वजणही तसाच प्रयत्न करत होतो, असे त्यांनी नमूद केले. दुर्दैवी घटनेनंतर गेल्या 13 दिवसांत कुटुंब एकत्र आहे. कुठलाही पूर्वनियोजित कार्यक्रम नसताना काटेवाडीत श्रीनिवास पवार, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार एकत्र मतदानासाठी आले, हे त्या एकजुटीचे उदाहरण आहे.Rohit Pawar



पवार साहेबांनी (शरद पवार) अलीकडेच जय पवार आणि कुटुंबातील इतर सदस्यांना मार्गदर्शन केले. हे मार्गदर्शन भावनिक स्वरूपाचे होते आणि अजितदादांच्या स्मरणार्थ काही गोष्टी पुढील काळात करण्याबाबत चर्चा झाली. पवार साहेबांच्या मनात एखादी गोष्ट आली की, ते आम्हाला बोलावून मार्गदर्शन करतात, असे रोहित पवार म्हणाले.

10 फेब्रुवारीला मी अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातील काही शंका मांडणार आहे. त्यानंतर 12 फेब्रुवारीला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत काय ठरले होते, हे सविस्तर सांगणार आहे, असे रोहित पवार यांनी जाहीर केले.

रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यामुळे कुटुंबीय कोणतेही राजकीय विचार करू शकत नव्हते. आमच्या मनात राजकारणाचा विचारच आला नाही. आता या धक्क्यातून सावरत आम्ही राजकीय दृष्टीने विचार करायला सुरुवात करणार आहोत. पवार कुटुंबात आतापर्यंत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही.

Sunetra Pawar Reflects Ajit Pawar’s Leadership, Rohit Pawar Hints at Pawar Family Reunion

महत्वाच्या बातम्या