विशेष प्रतिनिधी
मुंबई : अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलेले असताना त्या ठिकाणी विलीनीकरणाबाबत चर्चा कोणी आणि कशासाठी केली? हा प्रश्न जनतेसमोर यायला हवा, असा हल्लाबाेल राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांवर केला आहे. Sunil Tatkare
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातातील दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी 31 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला. मात्र या शपथविधीपूर्वी शरद पवार यांनी आपल्याला या निर्णयाची माहिती नसल्याचे सांगितल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही प्रमाणात खळबळ उडाली. या सगळ्या प्रक्रियेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि सुनेत्रा पवार यांच्यावर टीकेची झोड उठली.
या पार्श्वभूमीवर तटकरे म्हणाले की, हा शपथविधी कोणत्याही घाईत झालेला नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर तीन दिवसांचा शासकीय दुखवटा पाळण्यात आला. त्यानंतर चौथ्या दिवशी विधिमंडळ पक्षाची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत गटनेत्याची निवड करण्यात आली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात आले. त्यानुसार राज्यपालांकडून शपथविधी पार पडला. त्यामुळे तातडीचा निर्णय असा आरोप करणे अन्यायकारक आहे.Sunil Tatkare
तटकरे म्हणाले की, एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच झाला होता. लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतरही विधानसभेत पक्षाने आत्मविश्वासाने काम केले आणि 59 पैकी 41 जागांवर विजय मिळवला. अशा परिस्थितीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निधनानंतर नवी निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली, त्यात काही गैर वाटण्याचे कारण नाही.
विलीनीकरणाच्या चर्चेवर बोलण्यास नकार देत तटकरे म्हणाले की, या विषयावर वेगळे वातावरण तयार करण्यात आले आणि त्यात स्वतः ते आणि प्रफुल पटेल यांच्यावरही टीका झाली. मात्र सुनेत्रा पवार यांनी स्वतःला सावरत पक्षाच्या विचारांना पुढे नेण्यासाठी पाऊल उचलले, हे महत्त्वाचे आहे. अजित पवार यांची भूमिका स्पष्ट होती की, भाजपसोबत आणि एनडीएमध्ये सरकार स्थापन करावे. त्याच भूमिकेवर पक्ष आजही ठाम आहे. पुढील वाटचाल एनडीएमध्येच राहील. Sunil Tatkare
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. याबाबत तटकरे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्य सरकारने आधीच केंद्राच्या नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सखोल चौकशीची विनंती केली आहे. या घटनेतील सत्य लवकरात लवकर जनतेसमोर यावे, हीच पक्षाची भूमिका आहे.
पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत तटकरे यांनी सांगितले की, या विषयावर कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि त्यांनी स्वतः भूमिका स्पष्ट केली आहे. आमदार आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन पक्ष निर्णय घेईल. पक्षाच्या घटनेनुसार लवकरच प्रक्रिया पूर्ण केली जाईल. Sunil Tatkare
Who discussed merger while Ajitdada’s body was being laid to rest? Sunil Tatkare attacks Sharad Pawar group
महत्वाच्या बातम्या
- राहूल गांधींना खाेट्या आरोपांनी फक्त चर्चेत राहायचंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाेरदार हल्लाबाेल
- Shaktipeeth Project : शक्तिपीठचा खर्च १ लाख कोटी, महामार्ग आता १२ ऐवजी १३ जिल्ह्यांतून जाणार
- जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून वाद, जिवलग मित्राने पाठलाग करत दुसऱ्यावर केले काेयत्याने सपासप वार
- भारत आणि अमेरिका यांच्यातील नवा व्यापार करार शेतीसाठी चिंताजनक,