CM Devendra Fadnavis : जयंत पाटील, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक

विशेष प्रतिनिधी

मुंबई ‘ CM Devendra Fadnavis शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीएमध्ये सामील होण्याबाबत चर्चा काही दिवसांपूर्वीच रंगली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आहे.CM Devendra Fadnavis

जयंत पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटतरे आणि प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते. त्यामुळं राजकीय वर्तुळात विविध चर्चां रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा पक्ष एनडीएमध्ये सामील होणार का? अशी देखील चर्चा सुरु आहेत. दरम्यान, जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट कोणत्या कारणासाठी घेणार आहेत? हे मात्र अद्याप समजलेलं नाही.CM Devendra Fadnavis



 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अर्थखात्याबाबत आपला दावा कायम राखला आहे. महायुतीत अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आले होते, त्यामुळे ते पुन्हा माघारी मिळावे अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून करणार असल्याचे सुनील तटकरे यांनी म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर आज सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी पोहचले. मात्र त्यानंतर 20 मिनिटांनी जयंत पाटील देखील वर्षा निवासस्थानी पोहचले. यानंतर जयंत पाटील, सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक होत असल्याचे समोर येत आहे. या भेटीचे कारण गुलदस्त्यात असले तरी, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट भाजपप्रणित एनडीएत सहभागी होण्याच्या चर्चांना पुन्हा उत आला आहे. शरद पवार गट राज्यातील महायुतीत सहभागी होईल की केंद्रातील सत्तेत यावर अजूनही संभ्रम आहे. राज्यात काहीतरी महत्त्वपूर्ण घडामोडी घडत असल्याच्या चर्चांना भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनीही दुजोरा दिला.

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांची जवळपास सव्वा तास मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली.

शरद पवार गटातील नऊ आमदार आणि काही खासदारांसोबत जयंत पाटील यांची बैठक झाली होती या बैठकीत एनडीए मध्ये सामील व्हावं याकरिता सर्व आमदारांना खासदारांमध्ये एक मत झालं होतं मात्र रोहित पवार हे या बैठकीत उपस्थित नव्हते. रोहित पवार यांनी कायमच एनडीए सोबत न जाण्याबाबत वक्तव्य केलेले आहे त्यामुळे रोहित पवार वगळता शरद पवार गटातील सर्व आमदार आणि खासदार यांचं केंद्रात इंडिया आणि राज्यात महायुती सोबत जाण्यास एकमत आहे त्यामुळे शरद पवार काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं असून त्याच पार्श्वभूमीवर आज जयंत पाटील यांनी भेट घेतली का असा प्रश्न सध्या पडत आहे.

Jayant Patil, Praful Patel and Sunil Tatkare meet CM Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या