Vaishali Mane, : ‘सीआयडी’च्या अधीक्षक वैशाली माने यांच्या बदलीला ब्रेक, गृहमंत्रालयाचा निर्णय!

विशेष प्रतिनिधी

मुंबई: Vaishali Mane, पोलीस दलातील पुरुषप्रधान मानसिकतेवर थेट बोट ठेवणाऱ्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) पोलीस अधीक्षक वैशाली माने यांच्या बदलीला अखेर राज्य सरकारने ब्रेक लावला आहे. त्यांच्या रोखठोक भूमिकेनंतर गृह विभागाने मिरा-भाईंदर पोलीस उपायुक्त (DCP) पदावरील त्यांची बदली रद्द केली असून, तूर्तास त्यांना ‘प्रतीक्षाधीन’ (Waiting) ठेवण्याचा आदेश जारी केला आहे.Vaishali Mane,

वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याने व्यवस्थेविरोधात उगारलेल्या या आवाजाची आणि त्यानंतर सरकारच्या या तातडीच्या पावलाची सध्या पोलीस वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.Vaishali Mane,



 

नेमकं काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वीच राज्य शासनाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. यामध्ये वैशाली माने यांची बदली मिरा-भाईंदर येथे पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली होती. मात्र, नेहमीप्रमाणे महिला अधिकाऱ्यांना साईडलाईन किंवा दुय्यम स्वरूपाची पदे दिली जात असल्याचा आक्षेप घेत माने यांनी या बदलीवर जाहीर नाराजी व्यक्त केली.केवळ नाराजीच नाही, तर त्यांनी थेट माध्यमांसमोर येत पोलीस दलातील निर्णयप्रक्रियेवर आणि महिलांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आपली भूमिका मांडताना वैशाली माने यांनी अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणारे मुद्दे उपस्थित केले होते. पुरुष अधिकाऱ्यांच्या तुलनेत महिला अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या आणि मुख्य प्रवाहातील जबाबदाऱ्या देताना समान निकष लावले जात नाहीत.

कर्तृत्व असूनही महिला अधिकाऱ्यांच्या वाट्याला वारंवार दुय्यम दर्जाची पदे दिली जातात.तर महिला अधिकारी म्हणून काम करताना येणाऱ्या अडचणी, त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षा आणि त्यांचे व्यावसायिक योगदान यांचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. असही त्या म्हणाल्या.

सरकार बॅकफूटवर; आदेश मागे!

एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने थेट व्यवस्थेच्या त्रुटींवर बोट ठेवल्याने गृह विभागात एकच खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणाची गंभीर दखल घेत सरकारने आपला आधीचा बदलीचा आदेश मागे घेतला आहे. नव्या आदेशानुसार वैशाली माने यांची मिरा-भाईंदर येथील नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. तर त्यांना सध्या कोणत्याही पदावर न ठेवता ‘प्रतीक्षाधीन’ठेवण्यात आले आहे. त्यांच्या पुढील नियुक्तीबाबत गृह विभाग स्वतंत्रपणे निर्णय घेणार आहे.

वैशाली माने यांच्या या बंडखोर आणि रोकठोक भूमिकेमुळे पोलीस दलातील महिला अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व, त्यांना मिळणाऱ्या संधी आणि अंतर्गत राजकारण यावर पुन्हा एकदा जाहीर चर्चा सुरू झाली आहे. सरकार बॅकफूटवर आले असले, तरी माने यांना आगामी काळात कोणती जबाबदारी दिली जाते आणि या संपूर्ण प्रकरणावर आता त्यांची पुढची भूमिका काय असणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Break the transfer of Vaishali Mane, the big decision of the Ministry of Home Affairs!

महत्वाच्या बातम्या