Baramati Plane Crash : बारामती विमान दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू; डीजीसीएकडून ब्लॅक बॉक्स तपास होणार

विशेष प्रतिनिधी

पुणे : Baramati Plane Crash बारामती विमानतळ परिसरात खासगी कंपनीच्या विमानाचा भीषण अपघात होऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीहून विमान अपघात तपासणी विभागाचे (Aircraft Accident Investigation Bureau – AAIB) विशेष पथक बारामती येथे दाखल झाले असून, अपघातस्थळी विमानाचे मुख्य अवशेष आणि ‘ब्लॅक बॉक्स’चा तपास सुरू करण्यात आला आहे.Baramati Plane Crash

दरम्यान, संबंधित विमानाची मालकी असलेल्या व्हीएसआर VSR Ventures Pvt. Ltd. कंपनीच्या संचालकांकडून चौकशीस संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. या कंपनीचीही स्वतंत्र चौकशी करण्यात येणार आहे.Baramati Plane Crash



उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचारासाठी बुधवारी सकाळी मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. डीजीसीएने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) विभागाच्या नोंदीनुसार सकाळी ८.१० वाजता विमानाने सुरक्षित उड्डाण केले होते. फ्लाइट ट्रॅकिंग डेटानुसार सुमारे ८.४० वाजता वैमानिकाने बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न केला.

मात्र, कमी दृश्यमानतेमुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने वैमानिकाने ‘मिस्ड अप्रोच’ घेत बारामती ATC शी ‘मे-डे कॉल’द्वारे संपर्क साधला. त्यानंतर काही मिनिटांतच विमान रडारवरून अदृश्य झाले आणि सुमारे ८.४५ वाजता धावपट्टीपासून सुमारे १०० मीटर अंतरावर आणि उंचीवरून वेगाने कोसळले. अपघातानंतर विमानाला भीषण आग लागून मोठा स्फोट झाला आणि विमान पूर्णतः जळून खाक झाले.

“हा राजकीय विषय नाही, तर निव्वळ अपघात”

VSR एव्हिएशनचे संचालक विजयकुमार सिंह यांनी सांगितले की, DGCA च्या निर्देशानुसार संबंधित विमान पूर्णपणे सुस्थितीत होते आणि कोणताही तांत्रिक बिघाड आढळलेला नाही. मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित कपूर यांना १६ हजार तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव होता, तर सहवैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांनाही सुमारे १,५०० तासांचा अनुभव होता. खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे वैमानिकाला धावपट्टीचा अचूक अंदाज न आल्याची शक्यता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार वैमानिक आणि ATC यांच्यात संपर्क झाला होता. सकाळच्या वेळी दृश्यमानता अत्यंत कमी होती. धावपट्टी न दिसल्याने विमानाने एक फेरी मारली आणि दुसऱ्या प्रयत्नात उतरताना हा अपघात झाला. AAIB आणि DGCA चे अधिकारी संयुक्तपणे तपास करत असून, याच कंपनीच्या एका विमानाचा २०२३ मध्ये अपघात झाला होता, त्या प्रकरणाची चौकशीही अद्याप सुरू आहे.

Baramati Plane Crash Under Scanner; DGCA to Examine Black Box

महत्वाच्या बातम्या