विशेष प्रतिनिधी
पुणे : Ajit Pawar दर निवडणुकीत विक्रमी मतदान होणाऱ्या बारामती तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वात कमी मतदान झाले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाच्या दुःखात बारामतकरांनी मतदानाकडे पाठ फिरवली असे बोलले जात आहे.Ajit Pawar
पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंदा ६८.८९ टक्के मतदान झाले आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत १.११ टक्के इतके कमी मतदान झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ७९.३० टक्के मतदान वेल्हे तालुक्यात तर, सर्वात कमी ५४.९० टक्के मतदान बारामती तालुक्यात झाले आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामती तालुक्यात कमी मतदान झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.Ajit Pawar
पुणे जिल्हा परिषदेच्या सन २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ७० टक्के मतदान झाले होते. त्यात यंदाच्या निवडणुकीत १.११ टक्क्यांनी घट झाली आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण २९ लाख ७६ हजार ८०५ इतके मतदार होते. यामध्ये १५ लाख २७ हजार १५१ पुरुष, १४ लाख ४९ हजार ५६० महिला आणि अन्य ९४ मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण मतदारांपैकी २० लाख ५० हजार ७२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
तालुकानिहाय झालेले मतदान (टक्केवारीत)
– जुन्नर — ६१.१८ टक्के
– आंबेगाव — ६५.३० टक्के
– शिरूर — ७५.५९ टक्के
– खेड — ७५.४६ टक्के
– मावळ — ७७.४३ टक्के
– मुळशी — ६३.७९ टक्के
– हवेली — ६८.०२ टक्के
– दौंड — ६५.०० टक्के
– पुरंदर — ६८.३७ टक्के
– वेल्हे — ७९.३० टक्के
– भोर — ७५.६२ टक्के
– बारामती — ५४.९० टक्के
– इंदापूर — ६५.६७ टक्के
– एकूण — ६८.८९ टक्के
Baramati Turns Away From Ballot Amid Ajit Pawar’s Personal Tragedy
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
- विमान अपघातप्रकरणी अजित पवार यांच्या खासगी सचिवांची सीआयडीकडून चार तास चौकशी
- Government identity : तृतीयपंथांना सरकारी “ओळख”;कोणत्या योजनांचा मिळणार लाभ?
- CM Devendra Fadnavis : विदर्भाच्या सर्वांगीण विकासावर भर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प