अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू, व्हीएसआर कंपनीचे खासगी विमान

विशेष प्रतिनिधी

बारामती : बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याचे समारे आले आहे. व्हीएसआर कंपनीचे खासगी विमान हाेते. या अपघातात अजित पवार यांच्यासह त्यांचे स्वीय्य सहाय्यक तसेच पायलट आणि फ्लाईट अटेंडंट यांचाही मृत्यू झाला आहे.

या विमानात अजित पवार यांच्यासह एकूण पाच प्रवासी हाेते. त्यामध्ये मुंबई येथील सहाय्यक विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश आहे.

हे छोटेखानी विमान लँडिंगदरम्यान विमानतळाजवळच हे विमान कोसळलं. लँडिंग करताना काही तांत्रिक दोषामुळे विमान कोसळल्याची शक्यता आहे. विमान काेसळल्यावर मोठी आग लागली. त्यात हे विमान जळून खाक झाले.

अजित पवार हे पहाटेच कामाला सुरुवात करतात ही त्यांची सवय आहे. आज देखील सकाळीच ते मुंबईहून छोट्या विमानाने बारामतीला निघाले होते. त्यांच्या आज बारामतीमध्ये चार सभा होत्या. अजित पवार हे जिल्हा परिषदेच्या जोरात तयारीला लागले होते.

Five people including Ajit Pawar died in a private plane of VSR company

महत्वाच्या बातम्या