प्रतिनिधी: विश्वजीत भालेराव
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या आगामी कारभारीसाठी प्रशासकीय महापौर बंगला पुन्हा एकदा सज्ज होत आहे. गेली चार वर्षे प्रशासकीय राजवट असल्याने हा बंगला अक्षरशः धूळ खात होता. मात्र आता महापालिका निवडणुकीनंतर पुण्याच्या महापौरपदी महिला विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने बंगल्यात पुन्हा हालचालींना वेग आला आहे. Mayor’s bungalow
महापालिका निवडणुकीत भाजपाने एक हाती वर्चस्व मिळवल्याने भाजपची महिला महापौर होणार हे निश्चित तर अजूनही महापौर पदाचा चेहरा हा गुलदस्त्यात असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तो स्पष्ट होणार आहे. पुण्यातील राजकीय वर्तुळात अनेक महिला नगरसेवकांची नावे चर्चेत आहेत. आता पक्षांतर्गत हालचाली, वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी आणि रणनीती बैठका यामुळे महिला नेतृत्वाची चर्चा अधिकच रंगत चालली आहे.
दरम्यान, महापौर बंगल्याची डागडुजी, रंगरंगोटी आणि सुसज्जता यांचे काम जोरात सुरू आहे. बंगल्याच्या अंतर्गत भागात आवश्यक दुरुस्त्या, रंगकाम, फर्निचरची पाहणी व बदल, तसेच विद्युत व पाणीपुरवठा व्यवस्थेची तपासणी केली जात आहे. यासोबतच बंगल्याच्या आवारातील गार्डनिंग, लॉनची साफसफाई, झाडझुडपांची छाटणी आणि नव्याने रोपे लावण्याचे कामही सुरू आहे. एकूणच प्रशासकीय महापौर बंगला पुन्हा एकदा देखणा आणि कार्यक्षम करण्यावर भर दिला जात आहे.
मात्र, एकीकडे बंगला सज्ज होत असताना या डागडुजीसाठी आणि सुसज्जतेसाठी नेमका किती खर्च येणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. चार वर्षांनंतर होत असलेल्या या कामांवर महापालिकेचा निधी किती खर्च होणार, त्याची प्रक्रिया किती पारदर्शक आहे, यावर राजकीय वर्तुळासह नागरिकही लक्ष ठेवून आहेत.
एकूणच, पुण्याच्या कारभारीसाठी बंगला सज्ज होत असताना, महिला महापौर कोण होणार आणि या तयारीचा आर्थिक बोजा किती असणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
Mayor’s bungalow ready; curiosity over Pune’s woman in charge, with an eye on the expenditure too!
महत्वाच्या बातम्या
- Ladki Bahin : लाडक्या बहिणींची पुन्हा झाडाझडती, २२ ते २५ लाख महिलांच्या ई केवायसीची तपासणी होणार
- नाद कुणाचाही करा, पण देवाभाऊ यांचा नाही, जयकुमारे गाेरे यांचा अभिजीत पाटलांना इशारा
- नागपुरातील महापौर पदासाठी आरक्षणात घोळ, विजय वडेट्टीवार यांचा आरोप
- कामटी जि.प. गटावरून वाद पेटला; सकल मराठा समाजाची आक्रमक भूमिका!