Suraj Chavan : माझा देव चोरला आज.. सूरज चव्हाणची भावपूर्ण श्रद्धांजली

विशेष प्रतिनिधी

पुणे:  Suraj Chavan माझा देव चोरला आज.. मला अजिबात विश्वास होत नाहीये की आपले लाडके कार्यसम्राट अजित दादा आपल्यात नाहीयेत…माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांधून दिलं… माझी काळजी घेतली… मला नवीन आयुष्य मिळवून दिलं…अजित दादांसारखा देव माणूस या जगात नाही… याचं मला लई वाईट वाटतय… लई दुःख होतंय…”अशी भावपूर्ण श्रद्धांजली बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण याने अजित पवार यांच्या निधनावर वाहिली.Suraj Chavan

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचार सभांसाठी ते मुंबईहून खासगी चार्टर्ड विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. मात्र बारामतीत लँडिंगदरम्यान विमान कोसळले. त्यांच्या अकाली निधनाने पवार कुटुंबासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, समर्थक आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.Suraj Chavan



अजित पवार यांच्या निधनाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळासह मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण याने अजित पवार यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे. सूरजने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर अजित पवार यांचा फोटो शेअर करत ‘धर्मवीर’ चित्रपटातील ‘आनंद हरपला’ हे गाणं लावून भावना व्यक्त केल्या आहेत. यासोबतच सूरजने एक भावुक पोस्टही शेअर केली असून त्यात तो म्हणतो, “मित्रांनो माझा देव चोरला आज.. मला अजिबात विश्वास होत नाहीये की आपले लाडके कार्यसम्राट अजित दादा आपल्यात नाहीयेत…माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांधून दिलं… माझी काळजी घेतली… मला नवीन आयुष्य मिळवून दिलं…अजित दादांसारखा देव माणूस या जगात नाही… याचं मला लई वाईट वाटतय… लई दुःख होतंय…”

पुढे तो म्हणाला, “माझ्या आई आप्पा नंतर अजित दादाने माझ्यासाठी इतकं केलं… मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवेन… दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.”

“My God Was Taken Away Today”: Suraj Chavan’s Emotional Tribute

महत्वाच्या बातम्या