विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे महानगरपालिकेने वर्धापन दिनाचे कोणतेही जल्लोष किंवा सांस्कृतिक कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त झालेल्या तीव्र संतापानंतर महापालिकेने आधी नियोजित असलेले सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे महानगरपालिकेचा वर्धापन दिन १५ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरा होणार होता. यानिमित्ताने महापालिकेच्या सांस्कृतिक कलामंचातर्फे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्य, नाटक, ऑर्केस्ट्रा, गायन-वादन, वैयक्तिक कला तसेच छायाचित्र व हस्तचित्र प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत कामगार कल्याण विभागाकडून अधिकृत परिपत्रकही जारी करण्यात आले होते.
मात्र अजितदादांच्या निधनानंतर अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे योग्य नसल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तीव्रपणे व्यक्त केली. काही ठिकाणी नाराजी आणि संताप व्यक्त झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. यंदा वर्धापन दिन कोणत्याही उत्सवी वातावरणाशिवाय, अत्यंत साधेपणाने पाळण्यात येणार आहे. कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनाचे उपक्रम किंवा सार्वजनिक जल्लोष होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Pune Civic Body Backs Down After Workers’ Anger, Anniversary Celebrations Cancelled
महत्वाच्या बातम्या
- राहूल गांधींना खाेट्या आरोपांनी फक्त चर्चेत राहायचंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाेरदार हल्लाबाेल
- Shaktipeeth Project : शक्तिपीठचा खर्च १ लाख कोटी, महामार्ग आता १२ ऐवजी १३ जिल्ह्यांतून जाणार
- जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून वाद, जिवलग मित्राने पाठलाग करत दुसऱ्यावर केले काेयत्याने सपासप वार
- भारत आणि अमेरिका यांच्यातील नवा व्यापार करार शेतीसाठी चिंताजनक