Sharad Pawar : पुण्यात शरद पवार गटाची केवळ चार जागांवर बोळवण, अजित पवार गट लढवणार 128 जागा

विशेष प्रतिनिधी

पुणे: Sharad Pawar पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या एकत्र निवडणूक लढविण्याची खूप चर्चा झाली. यातून शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांनी राजीनामाही दिला. मात्र या युतीत शरद पवार गटाची केवळ चार जागांवर बोळवण करण्यात आली आहे.Sharad Pawar

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्रितपणे लढणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेतून दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले होते. सुरुवातीला राजकीय वर्तुळात शरद पवार गट 18 जागांवर आणि अजित पवार गट उर्वरित 110 जागांवर आपले उमेदवार उभे करतील, असा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, प्रत्यक्ष उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर या चर्चांमधील तफावत समोर आली आहे.Sharad Pawar



अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 32 प्रभागांतील 128 उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये शरद पवार यांच्या ‘तुतारी’ चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी असल्याचे दिसून येत आहे. केवळ प्रभाग क्रमांक 26 मधील चार उमेदवारांच्या नावांसमोर ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे 18 जागांच्या दाव्याऐवजी शरद पवार गटाला प्रत्यक्षात केवळ 4 जागा मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

जाहीर झालेल्या यादीच्या आकडेवारीनुसार, अजित पवार यांच्या ‘घड्याळ’ चिन्हावर एकूण 123 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. प्रभाग क्रमांक 13 मध्ये अजित पवार गटाचे केवळ तीन उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत, तर उर्वरित सर्व प्रभागांत त्यांच्याच उमेदवारांचे वर्चस्व दिसत आहे. एकत्रित निवडणूक लढवण्याचे जाहीर केले असले तरी, जागावाटपात अजित पवार गटानेच सिंहाचा वाटा घेतल्याने आणि शरद पवार गटाला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागल्याने राजकीय वर्तुळात या नवीन समीकरणाची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Sharad Pawar Faction Left with Just Four Seats in Pune, Ajit Pawar Camp to Contest 128

महत्वाच्या बातम्या