विशेष प्रतिनिधी
पुणे : मांजरी बुद्रूक, केशवनगर साडेसतरानळी, शेवाळवाडीमधील शिवसेना उमेदवार राजश्री माने, संदीप लोणकर, सीमा घुले व नीलेश घुले यांचे प्रचारादरम्यान ठिकठिकाणी स्वागत झाले. Manjari Budruk-Keshavnagar.
“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना महिलांच्या उत्कर्षासाठी प्रभावशाली ठरली आहे. नगर विकास मंत्री म्हणून शिंदे यांचा थेट प्रभागाच्या विकासात सहभाग असणार आहे. हा विकास सक्षमपणे राबविण्यासाठी शिवसेनेने अनुभवी उमेदवार दिले आहेत. मी केशवनगरच्या उपसरपंच व सदस्यपदी काम केले आहे. त्यामुळे मला नियोजनबद्ध विकासाचा अनुभव आहे. प्रभागातील चारही गावांत पूर्वीपासून लोणकर कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
उपमुख्यमंत्री शिंदे यांना मानणारा वर्ग आहे. त्या सर्वांच्या मदतीने प्रभागात विकास पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू,” अशी ग्वाही उमेदवार संदीप लोणकर यांनी दिली.
“एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुरक्षित वाहतूक, केशवनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पुरेसा पाणीपुरवठा व विविध पायाभूत सुविधा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील वाचनालय अशी कामे आम्ही करणार आहोत. उपमुख्यमंत्री शिंदे व शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या माध्यमातून शासननियुक्त सदस्य अमर घुले व विकी माने यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी प्रभागासाठी दिला आहे. त्यातून रस्ते, सांडपाणी अशा पायाभूत सुविधा येथे केल्या आहेत. नागरिकांची सुरक्षा, आरोग्य व सर्वसमावेशक विकास आराखडा करण्याचा आमचा संकल्प असल्याचे यावेळी आवर्जून सांगण्यात आले.
Shiv Sena is leading in the election campaign in Manjari Budruk-Keshavnagar.
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाने बोलावली बैठक, मतदानाची तारीख निश्चित होणार
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत
- संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन