विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : भारत-अमेरिका व्यापार करार मंजूर झाला, तर भारतातील शेतकरी आणि दुग्धोत्पादकांचे कंबरडे मोडेल. हा करार म्हणजे थेट भारतीय शेतकऱ्याच्या मृत्यूला दिलेली संमती आहे, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला. Raju Shetty
राजू शेट्टी म्हणाले की, या करारामुळे अमेरिकन शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला मका, सोयाबीन, दुग्धजन्य पदार्थ, कापूस आदी उत्पादने मोठ्या प्रमाणावर भारतात आयात केली जातील. परिणामी, देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळणार नाही आणि देशांतर्गत बाजारपेठ उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. अमेरिकन शेतीला मोठ्या प्रमाणात सबसिडी मिळते. अशा परिस्थितीत भारतीय शेतकरी स्पर्धा कशी करणार?” Raju Shetty
या कराराचा सर्वाधिक फायदा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना होणार असल्याचा आरोप करत शेट्टी म्हणाले, “हा करार मुकेश अंबानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्यासारख्या उद्योगसमूहांना लाभदायक ठरेल. मात्र भारतीय साखर उद्योग, दुग्धव्यवसाय आणि लघु शेतकरी पूर्णपणे मोडून पडतील.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर आमच्या ‘५६ इंच छातीच्या’ पंतप्रधानांनी नांगी टाकून या करारावर सही केली, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. हा करार देशहिताचा नसून परदेशी आणि कॉर्पोरेट हितसंबंध जपणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
राजू शेट्टी म्हणाले, “हा करार मंजूर झाला तर आता डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात बोलावून एकदा भारतीय शेतकऱ्याचा श्राद्ध घालणे एवढेच बाकी राहील. या मुद्द्यावर शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याची गरज असल्याचे सांगत, राजू शेट्टी यांनी देशभरातील शेतकऱ्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले.Raju Shetty