विशेष प्रतिनिधी
काबुल : Afghanistan–Pakistan मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षही चिघळल्याचे वृत्त आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हवाई हल्ल्यांचे आरोप केले असून सीमेलगतच्या भागात तणाव शिगेला पोहोचला आहे.Afghanistan–Pakistan
अफगाणिस्तानातील तालिबान प्रशासनाच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, त्यांच्या हवाई दलाने पाकिस्तानातील काही महत्त्वाच्या लष्करी तळांवर अचूक लक्ष्यभेदी कारवाई केली. रावलपिंडी येथील नूर खान एअरबेस, क्वेटा येथील १२ वी तुकडी, खैबर पख्तूनख्वा प्रांतातील मोहम्मद एजन्सी परिसर तसेच घलानी येथील तळांवर हल्ले केल्याचा दावा करण्यात आला आहे. या कारवाईत मोठे नुकसान झाल्याचे तालिबानचे म्हणणे आहे.Afghanistan–Pakistan
तालिबानने स्पष्ट केले की, पाकिस्तानने अलीकडेच काबुल, बगराम एअरबेस आणि इतर काही लष्करी ठिकाणांवर मध्यरात्री आणि पहाटे हवाई हल्ले केले होते. त्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानकडून मात्र या दाव्यांवर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.
तालिबान प्रशासनाने इशारा दिला आहे की, पाकिस्तानने पुन्हा अफगाण हवाई क्षेत्राचे उल्लंघन केल्यास अधिक कठोर आणि आक्रमक प्रत्युत्तर दिले जाईल. सीमाभागात दोन्ही बाजूंनी लष्करी सज्जता वाढवण्यात आल्याचेही समजते.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था अल जजीराने दिलेल्या माहितीनुसार काबुलमध्ये जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले. काही पाकिस्तानी लढाऊ विमाने अफगाण हवाई हद्दीत घुसल्याचा दावा करण्यात आला असून, त्यानंतर अफगाणिस्तानने अँटी एअरक्राफ्ट आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली सक्रिय केल्याचे सांगितले जात आहे.
बगराम एअरबेसवर हल्ल्याचा प्रयत्न?
रविवारी सकाळी पाकिस्तानी जेट्सनी अफगाणिस्तानच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केल्याचे वृत्त आहे. त्यानंतर अफगाण दलाने प्रतिकार करत गोळीबार केला. बगराम एअरबेसवर हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र तो परतवून लावल्याचा दावा अफगाणिस्तानकडून करण्यात आला आहे.
गेल्या चार दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू असल्याचे वृत्त आहे. सीमेलगतच्या भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून काही भागांतून लोकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केल्याची माहिती मिळत आहे.
या घडामोडींमुळे दक्षिण आशियातील सुरक्षेचे वातावरण अधिक अस्थिर झाले आहे. दोन्ही देशांकडून अधिकृत आणि सविस्तर माहिती येणे बाकी असले तरी परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय समुदायाचे बारकाईने लक्ष लागले आहे.
Afghanistan–Pakistan Conflict Escalates; Precision Strikes Target Key Military Bases in Pakistan
महत्वाच्या बातम्या
- Israeli missile : इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलचे क्षेपणास्त्र हल्ले
- जागतिक स्तरावरील संस्थांची मदत घ्या पण शंकांचे निरसन करा, सुनील तटकरे यांची विमान अपघाताबाबत मागणी
- पंकजा मुंडे यांच्या ब्रीफिंगला उपस्थित न राहिल्याने आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन
- Amol Mitkari : त्यांचे काका गेलेत, त्यामुळे स्टंट म्हणू नका, रोहित पवारांच्या मदतीला अमोल मिटकरी