विशेष प्रतिनिधी
लातूर : माजी खासदार, माजी कुलगुरू आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे यांचे साेमवारी सकाळी साडेआठ वाजता निधन झाले. ते ९२ वर्षांचे हाेते. डॉ. वाघमारे यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळगाव कवठा, ता. औसा, जि. लातूर येथे मंगळवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. Janardan Waghmare
11 नोव्हेंबर 1934 रोजी जन्मलेल्या डॉ. वाघमारे यांनी आयुष्यभर शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. शिक्षणतज्ज्ञ, साहित्य अभ्यासक आणि राजकारणी म्हणून त्यांनी राज्यात व देशात स्वतंत्र ओळख निर्माण केली.डॉ. वाघमारे हे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक व पहिले कुलगुरू होते.
विद्यापीठाच्या स्थापनेपासून शैक्षणिक पायाभूत रचना उभारण्यापर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मराठवाड्यात उच्च शिक्षणाची दारे सर्वसामान्यांसाठी खुली करण्यामागे त्यांचा मोठा वाटा होता. इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले. अफ्रिकन साहित्य, दलित साहित्य आणि पुरोगामी साहित्य चळवळीवर त्यांनी सखोल अभ्यासपूर्ण लेखन व संशोधन केले. सामाजिक न्याय, समता आणि परिवर्तनवादी विचारसरणी यांवर त्यांनी परखड मांडणी केली. Janardan Waghmare
डॉ. वाघमारे हे काँग्रेस पक्षाकडून राज्य सभेवर निवडून गेले होते. राज्यसभेतील कार्यकाळात त्यांनी शिक्षण, सामाजिक न्याय आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर प्रभावी भूमिका मांडली. तसेच लातूर नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. Janardan Waghmare
शिक्षण क्षेत्रात संपूर्ण भारतभर ओळख असलेल्या ‘लातूर पॅटर्न’चे जनक म्हणून डॉ. वाघमारे सर ओळखले जातात. स्पर्धात्मक व निकालाभिमुख अभ्यासपद्धती, शिस्तबद्ध अध्ययन आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाची संकल्पना त्यांनी लातूरमध्ये रुजवली. आज देशभरात ज्याचा उल्लेख आदराने केला जातो, त्या लातूर पॅटर्नचा प्रारंभीचा पाया डॉ. जे. एम. वाघमारे यांनी घातला.
Former MP and Ex Vice-Chancellor Dr. Janardan Waghmare Passes Away
महत्वाच्या बातम्या
- Israeli missile : इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलचे क्षेपणास्त्र हल्ले
- जागतिक स्तरावरील संस्थांची मदत घ्या पण शंकांचे निरसन करा, सुनील तटकरे यांची विमान अपघाताबाबत मागणी
- पंकजा मुंडे यांच्या ब्रीफिंगला उपस्थित न राहिल्याने आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन
- Amol Mitkari : त्यांचे काका गेलेत, त्यामुळे स्टंट म्हणू नका, रोहित पवारांच्या मदतीला अमोल मिटकरी