LPG Prices : अमेरिका–इस्रायल–इराण युद्धाचा परिणाम; देशात गॅस सिलिंडर महाग

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. नवीन दर शनिवार, 7 मार्चपासून लागू करण्यात आले आहेत.

सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 115 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मध्यपूर्वेतील युद्धामुळे भविष्यात गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही दरवाढ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. LPG Prices

आखाती देशांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. याचा परिणाम एलपीजी अर्थात लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसच्या पुरवठ्यावर होऊ शकतो. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा एलपीजी आयात करणारा देश आहे. देशाच्या एकूण एलपीजी गरजेपैकी सुमारे दोन तृतीयांश गॅस आयातीवर अवलंबून आहे. गेल्या वर्षी देशात सुमारे 33.15 दशलक्ष मेट्रिक टन घरगुती गॅसचा वापर झाला होता. LPG Prices



भारतामध्ये येणाऱ्या एलपीजी गॅसचा मोठा पुरवठा कतारमधून होतो. मात्र इराणने कतारमधील काही रिफायनरींवर हल्ले केल्याने त्या रिफायनरी सध्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात गॅसचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी केंद्र सरकारने सिलिंडरच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. LPG Prices

दरवाढीनंतर मुंबईत 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरचा दर 852.50 रुपयांवरून 912.50 रुपयांवर पोहोचला आहे. दिल्लीत हा दर 853 रुपयांवरून 913 रुपये झाला आहे. तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचा दर मुंबईत 1883 रुपये झाला असून दिल्लीत तो 1835 रुपयांवर पोहोचला आहे. एप्रिल 2025 नंतर पहिल्यांदाच गॅसच्या किमतीत इतकी मोठी वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेल्या किमती अचानक वाढल्याने गृहिणींच्या घरगुती बजेटवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. LPG Prices

दरम्यान, मध्यपूर्वेतील परिस्थितीमुळे सध्या पुरवठ्यात काही अडचणी निर्माण झाल्या असल्या, तरी ग्राहकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. लवकरच पर्यायी मार्गाने गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे. LPG Prices

याचदरम्यान पुण्यात व्यावसायिक गॅस पुरवठ्याबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बीपीसीएलच्या शिक्रापूर प्लांटमध्ये आणि एचपीसीएलच्या चाकण येथील प्लांटमध्ये कमर्शियल सिलिंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्यात आला आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत कमर्शियल सिलिंडर घेण्यासाठी गाड्या पाठवू नयेत, अशा सूचना तेल कंपन्यांनी डीलर्सना दिल्या आहेत. त्यामुळे व्यावसायिक क्षेत्रावरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

LPG Prices Hiked Amid US–Israel–Iran War; Domestic Cylinder Up by ₹60

महत्वाच्या बातम्या