विशेष प्रतिनिधी
पुणे/अहमदाबाद: Team India Creates History जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागलेल्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या या थरारक लढतीत भारताने सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरून नवा इतिहास रचला आहे.Team India Creates History
धावांचा डोंगर आणि फलंदाजांचा झंझावात
अंतिम सामन्यात न्यूझीलंडने टॉस (नाणेफेक) जिंकला होता. आणि त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी सार्थ ठरवला. भारताने निर्धारित २० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात २५५ धावांचा विक्रमी डोंगर उभा केला.Team India Creates History
संजू सॅमसनचे वादळ: संजूने अवघ्या ४६ चेंडूत ८९ धावांची आक्रमक खेळी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी केली.
अभिषेक आणि इशानची साथ: सलामीवीर अभिषेक शर्माने १८ चेंडूत अर्धशतक ठोकून भारताला स्फोटक सुरुवात करून दिली, तर इशान किशनने ५४ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
बुमराहची भेदक गोलंदाजी
२५६ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर सपशेल अपयशी ठरला. न्यूझीलंडचा डाव १५९ धावांवरच आटोपला.
जसप्रीत बुमराह: आपल्या भेदक गोलंदाजीने बुमराहने १५ धावांत ४ बळी घेत न्यूझीलंडचे कंबरडे मोडले. त्याला ‘सामनावीर’ घोषित करण्यात आले.
अक्षर पटेल: मधल्या षटकांमध्ये अक्षरने ३ गडी बाद करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
विक्रमांचा पाऊस
या विजयामुळे भारताने क्रिकेट विश्वात अनेक नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत
१. टी-२० विश्वचषकात सलग दोनदा (Back-to-Back) विजेतेपद मिळवणारा भारत हा पहिला देश ठरला.
२. भारताने एकूण तिसऱ्यांदा (२००७, २०२४ आणि २०२६) टी-२० विश्वचषकावर नाव कोरले.
३. आपल्याच मायदेशात विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिला यजमान देश बनला आहे.
या विजयानंतर संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण असून पुण्यातही ठिकठिकाणी फटाके फोडून आनंद साजरा केला जात आहे. संजू सॅमसनला त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल ‘मालिकावीर’ (मॅन ऑफ द मॅच)पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Historic! Team India Creates History; Thrashes New Zealand to Clinch third Consecutive T20 World Cup Title!
महत्वाच्या बातम्या
- Chandrakant Patil : जूनपासून शाळा-महाविद्यालयांमध्ये मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण; चंद्रकांत पाटील यांची घोषणा
- Pune Metro : पुणे मेट्रोचा ‘विमेन्स डे’ धमाका: आता हक्काची जागा मिळणार!
- Jay Pawar : अजितदादांच्या विमान अपघाताबाबत जय पवार उद्या घेणार पत्रकार परिषद
- Raksha Khadse : क्रिकेटसह इतर अनेक खेळांमध्येही उज्वल भविष्य, रक्षा खडसे यांचे आवाहन