Qatar : देवाभाऊंच्या पुढाकाराने गर्भवती भगिनीसह ७० ते ८० जणांची कतारमधून सुरक्षित सुटका

विशेष प्रतिनिधी

Qatar इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावामुळे पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका कतारमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनाही बसला. या पार्श्वभूमीवर कतारमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील संदेश बोड्डेवार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावले. मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यालयाच्या अथक प्रयत्नामुळे बोडदेवार कुटुंबासह महाराष्ट्रातील सुमारे ७० ते ८० नागरिक आज सकाळी दोहा-मुंबई विमानाने भारतात परतले.Qatar

संदेश बोड्डेवार हे मागील दोन वर्षांपासून कतारमध्ये नोकरीसाठी वास्तव्यास आहेत. गेल्या आठ-दहा दिवसांपासून इराण-इस्रायल संघर्ष तीव्र झाल्याने कतारमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची भीती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर ते, त्यांची गर्भवती पत्नी तसेच मदतीसाठी आलेले सासू-सासरे यांच्यासह कुटुंबीय गंभीर परिस्थितीत अडकले होते. त्यातच कतारची एअरस्पेस बंद असल्याने आणि सौदीमार्गे व्हिसा मिळवणे कठीण झाल्याने भारतात परतण्याचे मार्गही बंद झाले होते.Qatar



या अडचणीच्या काळात बोड्डेवार यांनी उदगीर येथील मित्र अमोल निडवदे यांच्याशी संपर्क साधला. निडवदे यांनी ही परिस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने तत्काळ दखल घेत भारतीय दूतावासाशी समन्वय साधून मदतकार्य सुरू केले. दररोज संपर्क ठेवत धीर देण्यात आला आणि अखेर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून दोहा-मुंबई विमानाने सर्वांना सुरक्षित परत आणण्यात आले.

संदेश बोड्डेवार यांनी या मदतीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या कार्यालयातील मनोज मुंडे तसेच मदत करणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले. या संकटातून बाहेर काढणे म्हणजे आमच्यासाठी नवजीवनच असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Devabhau’s Initiative Ensures Safe Return of 70–80 People, Including Pregnant Woman, from Qatar

महत्वाच्या बातम्या