एलपीजी सिलेंडर महाग, जास्त पैसे मागितल्यास लगेच करा तक्रार

विशेष प्रतिनिधी

पुणे : मध्य पूर्वेत वाढत असलेल्या तणावामुळे आणि इस्राइल आणि इराणच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ होत असल्याची काही बातम्या समोर येत आहेत. महागाईच्या या परिस्थितीत काही ठिकाणी गॅस एजन्सी किंवा डिलिव्हरी कर्मचाऱ्यांकडून ठरलेल्या दरापेक्षा जास्त पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारीही येत आहेत. पुण्यातही काही गॅस एजन्सीकडून अधिक रकमेचे मॅसेज आले आहेत. LPG Cylinder

आंतरराष्ट्रीय पातळीवरील अस्थिरतेमुळे इंधनाच्या पुरवठ्यावर परिणाम होत असून त्याचा थेट परिणाम गॅस वितरण व्यवस्थेवर होत आहे. काही भागांत सिलेंडर पुरवठ्यात उशीर होत असल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

गॅसचा साठा आणि काळाबाजार रोखण्यासाठी काही ठिकाणी एका सिलेंडरनंतर दुसरा सिलेंडर बुक करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी घाबरून जास्त बुकिंग करू नये, असा संदेश देण्यात येत आहे.

गॅस सिलेंडर डिलिव्हरी करताना काही वेळा ‘डिलिव्हरी चार्ज’च्या नावाखाली अतिरिक्त रक्कम मागितली जाते. मात्र नियमानुसार बिलावर नमूद असलेल्या रकमेव्यतिरिक्त कोणतेही पैसे देणे बंधनकारक नाही. बिलामध्येच डिलिव्हरीचा खर्च समाविष्ट असतो.

ग्राहकांना त्रास झाल्यास सरकारकडून तक्रार करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत.



तक्रार नोंदवण्यासाठी

Indian Oil Corporation (Indane) – 1800-233-3555

Hindustan Petroleum (HP Gas) – 1800-2333-555

Bharat Petroleum (Bharat Gas) – 1800-22-4344

याशिवाय ग्राहकांना ‘My LPG’ ॲप किंवा अधिकृत वेबसाईटवरूनही ऑनलाइन तक्रार करता येते. स्थानिक स्तरावर समस्या कायम असल्यास तालुका किंवा जिल्हा अन्न व नागरी पुरवठा कार्यालयात लेखी तक्रार देण्याचाही पर्याय उपलब्ध आहे.

तक्रार करताना ग्राहक आयडी, गॅस एजन्सीचे नाव आणि बिलाची प्रत किंवा डिलिव्हरीची माहिती जवळ ठेवणे आवश्यक असते. यामुळे संबंधित कंपनीकडून तक्रारीवर तातडीने कारवाई करणे शक्य होणार आहे.

LPG Cylinder Prices Rise, Consumers Urged to Report Overcharging

महत्वाच्या बातम्या