Rahul Gandhi : सावरकर कथित मानहानी प्रकरणात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना दिलासा, खटला रद्द

विशेष प्रतिनिधी

नाशिक : Rahul Gandhi  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कथित मानहानी प्रकरणात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक न्यायालयाने या प्रकरणातील संपूर्ण कार्यवाही अधिकृतपणे रद्द केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा अंतिम निकाल लागल्याचे स्पष्ट झाले आहे. या खटल्यातील सर्व प्रक्रिया संपुष्टात आल्याची माहिती ज्येष्ठ विधिज्ञ जयंत जायभावे यांनी दिली.Rahul Gandhi

या प्रकरणाची सुरुवात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशापासून झाली होती. सुरुवातीला या न्यायालयाने प्रक्रियेचा आदेश काढला होता. त्या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांच्या वकिलांनी नाशिक सत्र न्यायालयात फौजदारी पुनरावलोकन अर्ज दाखल केला. या अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर सत्र न्यायालयाने तो अंशतः मंजूर केला आणि आधीचा प्रक्रिया काढण्याचा आदेश रद्द केला. तसेच अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाला मूळ अर्जावर नव्याने विचार करण्याचे निर्देश देण्यात आले होते.Rahul Gandhi



सत्र न्यायालयाच्या निर्देशानंतर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात पुन्हा सुनावणी सुरू झाली. या दरम्यान सरकारवाडा पोलिस ठाण्याने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 202 अंतर्गत अहवाल न्यायालयासमोर सादर केला. पुढील सुनावणीदरम्यान तक्रारदाराने स्वतःहून तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती नरवाडिया यांनी तक्रारदाराने तक्रार मागे घेतल्याच्या कारणावरून हा खटला निकाली काढण्याचा आदेश दिला. यामुळे या प्रकरणातील सर्व कायदेशीर प्रक्रिया समाप्त झाल्या

Relief for Rahul Gandhi in Savarkar Defamation Case; Court Quashes Complaint

महत्वाच्या बातम्या