हार्दिक पंड्या अडचणीत! टी 20 विश्वचषक जिंकल्यानंतर नेमकं काय घडलं?

विशेष प्रतिनिधी

पुणे: भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे वकील वाजिद खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी तक्रार नोंदवकी असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे क्रीडा क्षेत्रात आणि सामाजिक माध्यमांवर मोठी चर्चा रंगली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, ICC Men’s T20 World Cup स्पर्धेत भारताने विजेतेपद मिळवल्यानंतर खेळाडू मैदानावर विजयाचा जल्लोष साजरा करत होते. त्यावेळी अनेक खेळाडू भारतीय तिरंगा खांद्यावर घेऊन चाहत्यांसोबत आनंद साजरा करताना दिसले. त्याच वेळी हार्दिक पांड्या देखील आपल्या गर्लफ्रेंडसोबत मैदानावर उत्साहात दिसला होता. या सेलिब्रेशनदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरूनच हा वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

तक्रार कुणी दिली दिली?

पुण्यातील वकील साजिद खान यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.पोलिसांकडून राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, सेलिब्रेशनदरम्यान हार्दिक पांड्याच्या अंगावर तिरंगा होता. मात्र गर्लफ्रेंडसोबत बसल्यानंतर आणि मैदानावर झोपल्याच्या क्षणी राष्ट्रीय ध्वज खाली पडल्याचे आणि तो त्यावर लोळल्याचे दिसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय ध्वजाचा अवमान झाल्याचा दावा करत वकील वाजिद खान यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे.

तक्रारदार वाजिद खान यांनी सांगितले की,”राष्ट्रीय ध्वजाचा अपमान सहन केला जाणार नाही.यासंदर्भात पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.मात्र पोलिसांकडून कारवाई केली गेली नाहीतर कोर्टात याचिका दाखल करणार.

Crime against Hardik Pandya! What exactly happened after winning the T20 World Cup?

महत्वाच्या बातम्या