PM Modi : टीएमसीच्या कोणत्याही अत्याचारी नेत्याला सोडले जाणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : PM Modi  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (14 मार्च) पश्चिम बंगालमध्ये 18,680 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम बंगालमधील ‘ब्रिगेड परेड ग्राउंड’वर जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि टीएमसी पक्षावर जोरदार टीका केली. तसेच सभेला उपस्थित जनसमुदायाने दर्शविलेला उत्साह पाहून पश्चिम बंगालच्या लोकांच्या मनात काय चालले आहे हे स्पष्टपणे दिसून येते, असे म्हणत मोदींनी टोला लगावला.PM Modi

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘ब्रिगेड परेड ग्राउंड’चा इतिहास या गोष्टीचा साक्षीदार आहे की, जेव्हा जेव्हा पश्चिम बंगालने देशाला नवी दिशा दिली आहे, तेव्हा तेव्हा हेच ‘ब्रिगेड ग्राउंड’ बंगालचा आवाज बनून समोर आले आहे. ब्रिगेड मैदानावरून ब्रिटिश राजवटीविरुद्ध उठलेला आवाज संपूर्ण भारतात एका क्रांतीत रूपांतरित झाला होता. त्या संघर्षाचा परिणाम म्हणजे ब्रिटिश जुलूमशाही आणि लुटमारीचा अंत झाला आहे.PM Modi



आज पुन्हा एकदा एका नव्या क्रांतीचे, नव्या पश्चिम बंगालचे रणशिंग ब्रिगेड मैदानावरून फुंकायचे आहे. पश्चिम बंगालमधील बदलाची हाक आता स्पष्टपणे सर्वांना ऐकू येत आहे. पश्चिम बंगालमधील निर्दयी सरकारचा अंत आता अटळ आहे. पश्चिम बंगालमधील जंगल राजचे युग आता संपुष्टात येणे निश्चित आहे. म्हणूनच पश्चिम बंगालच्या कानाकोपऱ्यातून एक बुलंद घोषणा दुमदुमत आहे ‘आम्हाला यावेळी भाजपचे सरकार हवे आहे.’

टीएमसीवर जोरदार टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, टीएमसीने सभेला आलेल्या सर्वांना चोर म्हणून हिणवले. परंतु पश्चिम बंगालची सुजाण जनता हे नक्कीच जाणते की, खरे चोर कोण आहेत. खरं तर सत्तेवरील आपली पकड निसटत असल्याचे पाहून पश्चिम बंगालचे निर्दयी सरकार हवालदिल झाले आहे. आजही ही सभा होऊ नये म्हणून अडथळे निर्माण करण्यासाठी निर्दयी सरकारने आपल्याकडील प्रत्येक शस्राचा वापर केला. तुम्हाला सभेला पोहोचण्यापासून रोखण्यासाठी पूल अडवले, वाहने थांबवून वाहतूक कोंडी करण्याचा प्रयत्न केला, भाजपचे झेंडे काढून टाकले आणि पोस्टर्स फाडून टाकले. पण या निर्दयी सरकारने पाहावे की, इथे लोटलेला जनसागर रोखण्यात तुम्ही पूर्णपणे अपयशी ठरला आहात.

PM Modi Warns: TMC Leaders Behind Atrocities Will Face Action

महत्वाच्या बातम्या