विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली; पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे बिगुल आज वाजणार आहे. निवडणूक आयोग आज संध्याकाळी 4 वाजता या राज्यातीलनिवडणुकांच्या तारखा जाहीर करेल. बंगाल, आसाम, तामिळनाडूमध्ये 2-2 टप्प्यांत आणि केरळ, पुद्दुचेरीमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. Election
पाचही विधानसभांचा कार्यकाळ मे महिन्यात संपत आहे. 2021 मध्ये या सर्व पाच राज्यांमधील निवडणुकांची घोषणा 26 फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. गेल्या वेळी बंगालमध्ये 8 टप्प्यांत निवडणुका झाल्या होत्या. आसाममध्ये 3 आणि तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये एकाच टप्प्यात मतदान झाले होते.
निवडणूक यादी सुधारणेनंतर तामिळनाडूमधून सर्वाधिक मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाने सांगितले की, 27 ऑक्टोबर 2025 रोजी SIR प्रक्रिया सुरू झाली तेव्हा राज्यात एकूण 6,41,14,587 मतदार होते. सुमारे चार महिने चाललेल्या SIR मध्ये 74,07,207 लोकांची नावे वगळण्यात आली आहेत. राज्यात आता 5,67,07,380 मतदार नोंदणीकृत आहेत.
पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. सुमारे 58 लाख लोकांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यानंतर केरळमध्ये 8 लाख, आसाममध्ये 2 लाख आणि पुडुचेरीमध्ये सर्वात कमी 77 हजार लोकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली.
Election Process for Five States to Begin Today
महत्वाच्या बातम्या