पुणे : देशभरात खळबळ माजवून सोडणाऱ्या ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणात आता पुण्यातून एक धक्कादायक आणि तितकीच थक्क करणारी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी आणि पुण्याच्या नामांकित मॉडर्न कॉलेजमधील प्राणीशास्त्र (Zoology) विभागाची प्राध्यापिका मनीषा मांढरे हिच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, गुन्ह्यासाठी तिने वापरलेली अनोखी शक्कल पाहून तपास करणारी सीबीआय (CBI) देखील चक्रावून गेली आहे.
कोणताही पुरावा नाही, प्रश्न थेट तोंडपाठ!
तपासादरम्यान सीबीआयसमोर अत्यंत तांत्रिक अडचणी येत आहेत. त्याला कारण ठरली आहे मनीषा मांढरेची अफाट स्मरणशक्ती! मनीषाने कोणत्याही कागदपत्राचा किंवा डिजिटल पुराव्याचा आधार न घेता, केवळ स्वतःच्या तीव्र स्मरणशक्तीच्या जोरावर ‘नीट’ परीक्षेचे सर्व प्रश्न तोंडपाठ केले होते. तिने मागे कोणताही भौतिक किंवा डिजिटल पुरावा सोडलेला नाही. तिच्या याच चलाख पैलूमुळे तपासाची सुई फिरवताना सीबीआयचे अधिकारीही थक्क झाले आहेत.
मॉडर्न कॉलेजमध्ये CBI ची धाड; लॉकर आणि डेस्कची तपासणी
मनीषा मांढरेचा या घोटाळ्यात थेट हात असल्याचं उघड झाल्यानंतर सीबीआयच्या पथकाने पुणे पोलिसांच्या मदतीने पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात थेट धडक दिली. दोन दिवस सलग सुरू असलेल्या या कारवाईत सीबीआयने कॉलेज प्रशासनाला सोबत घेऊन मोठी झाडाझडती घेतली. मनीषा मांढरेचे कपाट, लॉकर आणि डेस्कची कसून तपासणी करण्यात आली.
तिचे कॉलेजमधील नियुक्तीपत्र आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय परीक्षा संस्थेत (NTA) तिची झालेली नियुक्ती, या सर्व कागदपत्रांची सीबीआयने बारकाईने तपासणी केली. याप्रकरणी मॉडर्न कॉलेजच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणातील दुसरी आरोपी मनीषा वाघमारे हिने चौकशीदरम्यान मनीषा मांढरेचे नाव घेतले होते. ठोस भौतिक पुरावे नसले तरी वाघमारेच्या जबाबाच्या आधारे सीबीआयने मांढरेला अटक केली असून, न्यायालयाने तिला १४ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.
कॉलेज प्रशासनाकडून तातडीने निलंबन!
मनीषा मांढरेच्या अटकेमुळे मॉडर्न महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला. या पार्श्वभूमीवर कॉलेज प्रशासनाने तातडीने एक उच्चस्तरीय प्रशासकीय बैठक बोलावली. या बैठकीत झालेल्या सखोल चर्चेनंतर, संस्थेची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून प्राध्यापिका मनीषा मांढरे हिच्या निलंबनाचे आदेश तातडीने जारी करण्यात आले आहेत.
सध्या सीबीआय पुणे पोलिसांच्या अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करून पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी या पेपरफुटीचे धागेदोरे शोधण्यासाठी कसून तपास करत आहे. या प्रकरणात आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा शोध आता घेतला जात आहे.
मांढरे, वाघमारे आणि खैरनारची एकत्रित चौकशी होणार!
या संपूर्ण नीट पेपरफुटी प्रकरणांमध्ये मास्टरमाईंड असलेल्या मोटेगावकरला अटक केल्यानंतर सीबीआयची तपास प्रक्रिया वेगाने वाढली आहे. आज पुण्यातल्या सीबीआय कार्यालयामध्ये मनीषा मांढरे आणि वाघमारे यांची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच यामध्ये महाराष्ट्रातून पहिल्यांदा अटक करण्यात आलेल्या आणि दहा लाख रुपये देऊन नेटचा पेपर खरेदी केलेल्या शुभम खैरनारला देखील दिल्लीहून सी बियाणे पुण्यातल्या कार्यालयात चौकशीसाठी त्यालाही आणण्यात आलं. सूत्रांच्या माहितीनुसार आता या तिघांची समोरासमोर बसून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळते.
How the paper of NEET was cracked, without leaving this evidence
महत्वाच्या बातम्या
- सोलापूर स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपचं पारडं जड; कुणाला मिळणार संधी?
- महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- नीट-यूजी २०२६’ पेपरफुटी प्रकरणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- पुण्यात कॅन्सर रुग्णालयाच्या उद्घाटनाआधीच वाद; श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांचे नाव दिल्याने चर्चा