विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे पवार कुटुंब, बारामतीकर आणि संबंध राज्यवर शोककळा पसरली आहे. अजितदादांच्या निधनाची वार्ता समजताच सुप्रिया सुळे यांनी उद्धवस्त झाल्याची प्रतिक्रिया दिली. अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांना अश्रू अनावर झाले. Supriya Sule
अजित दादांच्या विमानाचा अपघात झाला. या दुर्घटनेत त्यांचे निधन झाल्याचे समजताच बारामतीतल्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने तात्काळ बंद केली. अजितदादांना दाखल असलेल्या रुग्णालयाकडे कार्यकर्ते आणि शहरवासीयांनी धाव घेतली.पाेलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी अपघाताची माहिती देताना म्हणाले की, अपघातामध्ये विमानाचे प्रचंड नुकसान झालेय. घटनास्थळावरून तीन मृतदेह सापडलेत. त्यांचीही अवस्था अत्यंत गंभीर असून ओळख पटणेही मुश्कील झाले आहे. आम्ही तांत्रिक तपासणी आणि ओळख पटवण्याची प्रक्रिया वेगाने करत आहोत.’
अजित पवारांच्या विमानाला अपघात झाल्याचे समजताच त्यांच्या बहीण सुप्रिया सुळे, पत्नी सुनेत्रा पवार या दिल्लीहून तात्काळ बारामतीकडे रवाना झाल्याचे समजते. सुप्रिया सुळे यांनी एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवून एकाच शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी devasted असे व्हॉटसअप स्टेटस ठेवून आम्ही उद्धवस्त झालो आहोत, अशा भावना व्यक्त केल्या.
अजितदादांच्या निधनाची वार्ता समजताच श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आणि शरद पवारांचे पणतू युगेंद्र पवार यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या अश्रूंचा फोनवर बोलतानाच बांध फुटला. यापू्र्वी २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी बारामतीतून निवडणूक लढवली होती. मात्र, निवडणूक संपल्यानंतर पवार कुटुंबाने आम्ही सारे एकच आहोत, हा संदेश नेहमीच महाराष्ट्राला दिला होता.
अजित पवारांच्या निधनाबद्दल धनंजय मुंडे यांनी शोक व्यक्त केला. वडिल गेले. त्याचे दुःख माझ्यावर कोसळले. मात्र, त्यानंतर अजितदादांनी वडिलांची उणीव कधी भासू दिली नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. अजित पवार यांच्या निधनाची वार्ता ऐकून राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना अनावर झाले. ते तातडीने बारामतीकडे रवाना झाले. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अजितदादांच्या निधनाची बातमी समजली. तेव्हा त्यांना सुद्धा अश्रू अनावर झाले. त्यांनी दादांसोबत काम केलेल्या अनेक आठवणी माध्यमांशी बोलताना शेअर केल्या. दादांच्या अकाली निधनाने मोठे नुकसान झाले असून, ते भरून निघणारे नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘अजित दादा हे राजकारणात शब्द पाळणारे कुशल प्रशासक होते. जे होणार नाही ते स्पष्ट सांगणार. जे होणार ते काम करणार असे स्पष्टवक्ता नेता होते. मी ज्यावेळी मंत्रिमंडळात पहिल्यांदा आलो तेव्हा मी त्यांचा राज्यमंत्री होतो. त्यांनी मला विभागाचे कामकाज कसे वागायचे याचे धडे दिले. त्यांच्याबरोबर कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले. २५ वर्ष त्यांच्याबरोबर काम केले. आज महाराष्ट्राच्या मातीतला मोठा नेता गमावला आहे. कल्पनेच्या पलीकडचे हे घडले आहे. एका लोकनेत्याला महाराष्ट्राने गमावले आहे.’
Supriya Sule said she was devastated after Ajit Pawar’s death.
महत्वाच्या बातम्या
- कोणताही रंग कुणाच्या बापाचा नाही, सयाजी शिंदे यांची मुंब्रा हिरवा करण्यावर संतप्त प्रतिक्रिया
- भाजपने परवानगी दिली तर शिंदे गटाचे नामोनिशाण मिटवून टाकेन, गणेश नाईक यांचा इशारा
- ‘आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही?’ महिला कर्मचाऱ्याचा गिरीश महाजनांना थेट सवाल!
- आता महाराष्ट्र थांबणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास