Azad Maidan : आझाद मैदानावर पान विक्रेत्यांचे शक्तिप्रदर्शन; एमकोका रद्द करण्याची मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Azad Maidan राज्य सरकारने बेकायदेशीर गुटखा व्यापाराविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा आणि भारतीय न्याय संहितेचे कलम ३२८ लागू करण्याच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील शेकडो पान विक्रेत्यांनी मंगळवारी मुंबईतील आझाद मैदानावर जोरदार आंदोलन केले.Azad Maidan

महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राज्यातील विविध भागांतून पान टपरी व्यावसायिक सहभागी झाले. महासंघाने दावा केला की, हे आंदोलन राज्यातील सात लाखांहून अधिक पान विक्रेते आणि त्यांच्या कुटुंबियांचे प्रतिनिधित्व करणारे आहे.Azad Maidan



राज्य सरकार आणि अन्न व औषध प्रशासनाने बेकायदेशीर गुटखा उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि वितरण करणाऱ्यांवर एमकोका आणि कलम ३२८ अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या कठोर कायद्यांचा वापर छोट्या पान व्यावसायिकांवरही होण्याची भीती आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

महासंघाचे राज्याध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी सांगितले की, हा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. यापूर्वी दोन उच्च न्यायालयांनी अशा प्रकरणांमध्ये कलम ३२८ लागू करता येणार नसल्याचे मत नोंदवले असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईतील मारोल नाका येथील पान विक्रेते राम गुप्ता यांनी सांगितले की, ते गुटखा विकत नाहीत. मात्र, एमकोका आणि कलम ३२८ सारख्या कठोर तरतुदींचा गैरवापर करून छोट्या व्यावसायिकांना त्रास दिला जाऊ शकतो. गुटखा विक्रीविरोधात कारवाईला त्यांचा पाठिंबा असला तरी सामान्य पान विक्रेत्यांवर एमकोका लावणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.

आंदोलनादरम्यान पान व्यापाऱ्यांनी सरकारकडे देशभरात एकसमान धोरण लागू करण्याची मागणी केली. तसेच संघटित गुन्हेगारी आणि कायदेशीर किरकोळ व्यवसाय यांच्यात स्पष्ट फरक करून प्रामाणिक पान व्यावसायिकांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक देऊ नये, अशी मागणी करण्यात आली.

महासंघाने सर्व पान विक्रेत्यांना त्यांच्या दुकानातून कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर अमली पदार्थांची विक्री होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन करत काहींच्या चुकीमुळे लाखो प्रामाणिक व्यावसायिकांची प्रतिमा खराब होऊ नये, असेही स्पष्ट केले.

Pan vendors stage protest at Azad Maidan, demand MCOCA charges be dropped

महत्वाच्या बातम्या