‘डॉक्टर बनण्याची फॅक्टरी ते हातात बेड्या ; कोण आहे शिवराज मोटेगावकर?

विशेष प्रतिनिधी

 

पुणे: नीट पेपरफुटी प्रकरणात आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकरला अटक करण्यात आली आहे. सीबीआयकडून काल रात्री साडेसात वाजता मोटेगावकरला अटक करण्यात आली,मात्र अटकेची अधिकृत माहिती आज देण्यात आली आहे. सीबीआयकडून मोटेगावकरची तब्बल 11 तास चौकशी करण्यात आली,पुणे आणि लातूर येथीl चौकशीनंतर शिवराज मोटेगावकरला काल रात्री अटक करण्यात आली आहे.सोबतच मोटेगावकर याच्या कोचिंग मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची आणि तिच्या वडिलांचे देखील सीबीआयकडून चौकशी करण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थिनीला मोटेगावकर यांच्याकडून नीट पेपरची प्रश्न आणि उत्तरे मिळाल्याचा सीबीआयला संशय आहे.



कोण आहे शिवराज मोटेगावकर?

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवराज मोटेगावकर यांनी नांदेड येथून त्यांचे M.sc केमिस्ट्री चे शिक्षण पूर्ण केले. स्वतःचे शिक्षण करत करत त्यांनी घरीच होम ट्युशन सुद्धा चालू केले, आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून स्वतःच्या शिक्षण पूर्ण केले. उमरगा आणि लातूर मधील काही महाविद्यालयांमध्ये त्यांनी केमिस्ट्रीचे प्राध्यापक म्हणून देखील देखील कार्य केले.पुढे त्यांनी लातूर येथे ‘ रेणुकाई ‘ कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून खासगी क्लासेसची सुरुवात केली आणि स्वतःचे स्वतंत्र केमिस्ट्री विषयाचे क्लास सुरू केले.‘RCC पॅटर्न’ विकसित करत महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये कोचिंग नेटवर्क उभारण्यात आले. मागील जवळपास 23 वर्षांपासून ते केमिस्ट्री विषयाचे खासगी मार्गदर्शन करत असून नीट आणि मेडिकल प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी RCC पॅटर्नची स्वतंत्र ओळख निर्माण केली.दरवर्षी नीट निकालात RCC पॅटर्नमधील शेकडो विद्यार्थी यशस्वी होत असल्याचा दावा केला जातो, तसेच हजारो विद्यार्थी RCC क्लासेसमध्ये प्रवेशित असल्याचे सांगितले जाते. नीट परीक्षांमध्ये दरवर्षी अनेक प्रश्न जुळत असल्याचा दावा मोटेगावकर वारंवार करत आले आहेत.

पेपरफुटीत मोटेगावकर यांनी काय केले?

आरसीसी कोचिंग क्लासेसचे संस्थापक शिवराज मोटेगावकर यांचे एनटीए सोबत संबंधित असलेल्या काही अधिकाऱ्यांशी आणि पी. व्ही कुलकर्णी यांच्यासोबत जवळचे संबंध आहेत.मोटेगावकर यांनी परीक्षेच्या पूर्वीच प्रश्नपत्रिका मिळवून ती उत्तरांसोबत विद्यार्थ्यांना दिल्याचा आरोप मोटेगावकर यांच्यावर आहे. सीबीआय कडून मोटेगावकर यांच्या चॅट्स, कॉल रेकॉर्ड, मोबाईलमधील डेटा याची सखोल तपासणी सुरू असून पेपरफुटिशी संबंधित अनेक पुरावे हाती लागल्याची माहिती समोर येत आहे.

Factory to become a doctor, handcuffs in hand; Who is Shivraj Motegaonkar?’

महत्वाच्या बातम्या