विशेष प्रतिनिधी
Nana Patole नाना पटोले हे सध्या शोले पिक्चरच्या असरानीच्या भूमिकेत आहेत. सगळे इकडे तिकडे गेले आहेत. त्यांच्यासोबत कोणी राहिला नाही. त्यांचे मुख्यमंत्री पदाचा स्वप्न धुळीस मिळालं आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.Nana Patole is Like Asrani from Sholay
पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, आज अमित शहा आणि पंतप्रधान मोदीजी महाराष्ट्रात सभा घेत आहेत. जनतेच्या विकासाकरिता महायुतीच्या सरकार या राज्यात यावं, डबल इंजिन सरकारने महाराष्ट्राच्या जनतेचा विकास करावा आणि महाराष्ट्र देशात एक क्रमांकाचा राज्य व्हावं याकरिता मोदी-शहा यांनी संबोधित केले आहे.
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत,त्यामुळे भाजपचा विजय हा खऱ्या अर्थाने नेतृत्वाचा विजय असतो, आमच्या जास्तीत जास्त जागा महायुती म्हणून भाजप,शिवसेना,राष्ट्रवादीच्या जागा यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. महायुतीचे सरकार यावे असे अमित शहा यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री बनण्याची कुठलीही चढाओढ महायुतीत नाही. आम्ही विकासाकरिता काम करतो आहे. मुख्यमंत्री पदासंदर्भात केंद्रीय नेतृत्व निर्णय करेलराजदीप सरदेसाई यांनी एका पुस्तकात भुजबळ यांच्याबाबत केलेल्या टिपणीवर बावनकुळे म्हणाले,
आज मी भुजबळ साहेबांसोबत होतो. त्यांनी व्यक्तिगतही मला असं सांगितलं की मी असं कुठेही बोललो नाही. त्यांनी मला व्यक्तिगत सांगितलं की सर्व काही खोटं आहे, मी कुठेही असं बोललो नाही. माझा कुठे गैरवापर करणे योग्य नाही. भुजबळ हे कायदेशीर कारवाई करतील असं दिसत आहे.
Nana Patole is Like Asrani from Sholay; His Dream of Becoming Chief Minister is Shattered: Chandrashekhar Bawankule’s Criticism
महत्वाच्या बातम्या
- Sadabhau Khot गावागाड्याची भाषा म्हणत दिलगिरी व्यक्त करताना सदाभाऊ खोत यांचा पुन्हा शरद पवारांना टोला
- Donald Trump अमेरिकेत ट्रम्प सरकार? 230 जागांवर ट्रम्प आघडीवर, कमला हॅरिस पिछाडीवर
- Devendra Fadnavis देशात अराजकता पसरविण्याचा राहुल गांधी यांचा डाव, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
- Manoj jarange : संपूर्ण महाराष्ट्र हादरवण्याच्या जरांगेंच्या गर्जना; प्रत्यक्ष लढण्यात आणि पाडण्यात आपला “निवडक” मराठवाडाच बरा!!