Rajya Sabha nomination : राज्यसभा उमेदवारीत भाजपचे साेशल इंजिनिअरींग, आठवले, विनाेद तावडे, माया ईवनाते, रामराव वडकुते यांना संधी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेच्या उमेदवारीत भारतीय जनता पक्षाने साेशल इंजिनिअरींग केले आहे. विविध समाजघटकांना राज्यसभेवर खासदारकीची संधी दिली आहे. भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारींत रामदास आठवले, विनाेद तावडे, माया ईवनाते आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी जाहीर केली आहे.Rajya Sabha nomination

रामदास आठवले हे केंद्रीय समाज कल्याण राज्य मंत्री आहेत. भारतीय रिपब्लिकन पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. दलीत समाजाचे देशपातळीवरील नेते म्हणून ते ओळखले जातात. भारतीय जनता पक्षासाेबत दलीत समाजाला जाेडण्यात त्यांची माेठी भूमिका राहिली आहे.
रामराव वडकुते हे धनगर समाजाचे नेते आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून २०१९ मध्ये त्यांनी हिंगाेली विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मागितली हाेती. मात्र, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून अल्पसंख्यांकांना न्याय मिळत नाही, असा आराेप करत त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला हाेता. रामराव वडकुते यांनी विधानपरिषदेत राष्ट्रवादीचे आमदार म्हणून काम केले आहे. धनगर आरक्षणासाठी त्यांनीही आवाज उठवला आहे. अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्षपद भूषवलं आहे.माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर त्यांनी धनगर समाजाच्या कामासाठी स्वत:ला वाहून घेतले.
2002 मध्ये राष्ट्रवादीने वडकुते यांची महाराष्ट्र राज्य शेळी मेंढी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. या नियुक्तीच्या काळातच त्यांनी महामंडळास अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले.Rajya Sabha nomination



2004 मध्ये वडकुते यांना राष्ट्रवादीने विधानसभेची उमेदवारी दिली. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पुढे 2009 च्या विधानसभा निवडणुकीत वडकुते यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजीव सातव यांच्यासाठी काँग्रेस पक्षाने ही जागा स्वत;कडे घेतली. त्यानंतर 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली.Rajya Sabha nomination

आदिवासी समाजातून येणाऱ्या माया ईवनाते या नागपूर महापालिकेत नुकत्याच नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. अनुसुचित जमातीच्या राष्ट्रीय आयाेगाच्या सदस्या म्हणून त्यांनी काम केले आहे. त्या मूळच्या विदर्भातील असून त्यांनी यापूर्वी नागपुर च्या महापौर म्हणून काम पाहिले आहे. भाजपने त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन विदर्भातील आदिवासी मतपेढीवर आपली पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाच्या संघटनात्मक कार्यात दीर्घकाळ सक्रिय असलेल्या इवनाते यांना ही उमेदवारी देऊन भाजपने निष्ठेचे फळ दिले आहे.Rajya Sabha nomination

BJP’s Social Engineering, Athawale, Vinod Tawde, Maya Evenate, Ramrao Vadkute get chance in Rajya Sabha nomination

महत्वाच्या बातम्या