विशेष प्रतिनिधी
पुणे : Dagdusheth Halwai पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे मंदिर अत्यंत प्रसिद्ध असे मंदिर आहे. या मंदिराला आता महाराष्ट्र सरकारने ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या दृष्टीने संस्थानाचा सर्वांगिण विकास होणार आहे. आधी हे मंदिर क वर्गात समाविष्ट होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त करत ही घोषणा केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दगडूशेठ गणपती संस्थानाला राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये विशेष स्थान मिळणार आहे.Dagdusheth Halwai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती या संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे एकूणच या क्षेत्राचा एकूणच तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगिण विकास होणार आहे.” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याचसोबत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या. “आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला राज्य सरकारकडून ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा प्रदान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून ही अत्यंत आनंदाची बाब आहे. या निर्णयामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असून, तीर्थक्षेत्र म्हणून या परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास मोठी मदत होईल. भाविकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होऊन पुण्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवात भर पडणार आहे.”
एखाद्या पर्यटन क्षेत्राला किंवा तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्ग दर्जा मिळाल्यामुळे तेथील पायाभूत सुविधांचा विकास जलद गतीने होतो. राज्य सरकारकडून त्या क्षेत्राच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध होतो, ज्यामुळे पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा (रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे इत्यादी) निर्माण करता येतात. तसेच, जागतिक स्तरावर किंवा राज्य पातळीवर त्या पर्यटन स्थळाची प्रसिद्धी वाढून पर्यटकांचा ओघ वाढतो. पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळतो, विविध व्यवसाय (हॉटेल्स, गाईड्स, वाहतूक, खाद्यपदार्थ) विकसित होतात. ‘अ’ वर्ग दर्जा असलेल्या ठिकाणी तीर्थक्षेत्र किंवा पर्यटन विकास आराखडा राबवून नियोजित पद्धतीने सुशोभीकरण आणि संवर्धन केले जाते.
CM announces ‘A’ class tourism status for Shrimant Dagdusheth Halwai Ganpati Temple
महत्वाच्या बातम्या
- सोलापूर स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपचं पारडं जड; कुणाला मिळणार संधी?
- महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- नीट-यूजी २०२६’ पेपरफुटी प्रकरणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- पुण्यात कॅन्सर रुग्णालयाच्या उद्घाटनाआधीच वाद; श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांचे नाव दिल्याने चर्चा